After landing at the Hyderabad airport, when the passengers went to collect their luggage, it was not there immediately. esakal
नाशिक

Nashik News : एअरलाईन्सचा गलथानपणा! विमान प्रवाशांना घेऊन हैदराबादला अन लगेज् नाशिकमध्येच

Nashik News : विमान हैदराबाद येथे पोहोचल्यानंतर प्रवाशांचे लगेज्‌ हे नाशिक विमानतळावरच राहिल्याचे निदर्शनास आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक - हैदराबाद इंडिगो गलथानपणा व सावळ्या गोंधळाचा फटका याच विमानाने प्रवास करणाऱ्या ८५ प्रवाशांना बसला आहे. विमान हैदराबाद येथे पोहोचल्यानंतर प्रवाशांचे लगेज्‌ हे नाशिक विमानतळावरच राहिल्याचे निदर्शनास आले.

यामुळे या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले असून, अनेकांना आपला पुढचा प्रवासही रद्द करावा लागला असून, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. (Nashik Indigo Airlines mistake about luggage)

नाशिक येथील ओझर विमानतळावरून मंगळवारी (ता.११) दुपारी २ वाजून २० मिनिटांनी एअरलाईन्सची नाशिक - हैदराबाद फ्लाईट होती. या विमानाने ८५ प्रवासी नाशिक येथून हैदराबादला जात होते. मात्र, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हे विमान तब्बल एक तास उशिराने हैदराबादकडे मार्गस्थ झाले.

सायंकाळी विमान हैदराबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रवासी आपले लगेज्‌ (सामान) ताब्यात घेण्यासाठी गेले असता, त्यांचे सामान विमानातून आलेलेच नसल्याचे समजले. विमानातून प्रवास करणाऱ्या साऱ्या प्रवाशांचे सामान हे नाशिक विमानतळावरच राहिल्याचे विमान कंपनी प्रशासनाकडून प्रवाशांना सांगण्यात आले.

तसेच, नाशिक विमानतळावर राहिलेले प्रवाशांचा लगेज्‌ हे बुधवारी (ता १२) सायंकाळी आणण्यता येईल, असेही एअरलाईन्स प्रशासनाकडून प्रवासांना सांगण्यात आले. यामुळे प्रवाशांचा अधिकच संताप होऊन त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागलेच मात्र, मोठा मनस्तापही झाला.

या प्रवाशांमध्ये काही प्रवासी हे रुग्ण असून त्यांचे वैद्यकीय औषधे त्यांच्या लगेजमध्येच आहेत. तसेच, काही प्रवाशांना हैदराबाद विमानतळावरून अन्य ठिकाणी प्रवास करावयाचा होता. मात्र, त्यांचे लगेज् न आणल्याने त्यांची मोठी अडचण व गैरसोय झाल्याने प्रवाशांनी ‘सकाळ’शी संपर्क साधून संताप व्यक्त केला आहे. (latest marathi news)

लगेज्‌ शिफ्टिंगचा प्रयत्न

दरम्यान, या ८५ प्रवाशांमधील काही प्रवासी हे हैदराबादवरून चेन्नई, बंगळूरू, तिरुपती, कोलकत्ताकडे जाणारे होते. त्या प्रवाशांना बाजुला नेण्यात आले आणि त्यांच्या लगेज् माहिती घेत ते त्यांच्या पुढच्या विमानतळाच्या ठिकाणी पोहोच करण्यासंदर्भात त्यांना आश्वासन दिले. परंतु त्याचवेळी जे हैदराबादमध्ये आलेले आहेत, त्यांचे लगेज्‌ बुधवारी (ता.१२) कधी येणार याबाबत कोणतीही माहिती दिलेली नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.

कोणतीही सुविधा नाही

विमान कंपनीकडून काही गैरसोय झाल्यास त्यासंदर्भात कंपनीकडून प्रवाशांची भरपाई वा त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते. परंतु एअरलाईन्सकडून असे कोणतीही भरपाई वा गैरसोय झाल्याने सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. यामुळे अनेकांना ऐनवेळी उद्‌भवलेल्या संकटाला सामोरे जाताना मनस्ताप झाला आहे.

"नाशिकहून आधीच विमान उशिराने निघाले. त्यातही आमचे लगेज्‌ नाशिकमध्ये ठेवून विमान हैदराबादला पोहोचले. आता लगेज्‌ची वाट पाहत येथे उद्यापर्यंत कसे थांबणार? अनेक प्रवासी हे रुग्ण असून त्यांची वैद्यकीय औषधे त्यांच्या लगेज्‌मध्येच राहिली आहेत. काहींना पुढच्या प्रवासाला जायचे आहे. याचा खूप मनस्ताप होतो आहे."- नितीन वानखेडे, प्रवासी, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT