Garbage on the side of the road. esakal
नाशिक

Nashik News : इंदिरानगरला ठिकठिकाणी कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट; साथीचे रोग बळविण्याची शक्यता

Nashik : इंदिरानगर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट तयार झाले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कचऱ्यामुळे साथीचे रोग बळविण्याचे शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इंदिरानगर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट तयार झाले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कचऱ्यामुळे साथीचे रोग बळविण्याचे शक्यता निर्माण झाली आहे. इंदिरानगर येथील पेठेनगर, कमोदनगर, पाटील गार्डन, एकता कॉलनी, राजीवनगर, संताजीनगर, श्रद्धा विहार, पांडवनगरी, कानिफनाथनगर, चेतनानगर, राणेनगर परिसरात कचरा वाढला असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. साथींच्या आजाराला एकप्रकारे आमंत्रण दिले जात आहे. (Indiranagar black spots of garbage )

पेठेनगर - चार्वाक चौक मार्गावरील नळे मळ्याजवळ परिसरातील, खाद्यपदार्थ, भाजीपाला, विक्रेत्यांकडून टाकाऊ पदार्थ, प्लॅस्टिक, फर्निचरचे टाकाऊ मटेरिअल रस्त्याजवळ टाकण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झाला आहे. सध्या या भागात कचऱ्याचे ढीग तयार झाले असून यातील काही कचरा कुजला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिकांना व रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एकता कॉलनी भागात चर्चजवळ एका खासगी मिळकतीत मोठ्या प्रमाणात टाकाऊ कचरा सातत्याने टाकण्यात येतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

पावसामुळे कचरा कुजत आहे. महानगरपालिकेने कचरा वाहतुकीची व त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची अद्ययावत यंत्रणा आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कार्यरत असताना परिसरातील सर्व कॉलनी परिसरात कचरा दिसून येतो. पाथर्डी फाटा ते मुंबई नाका भागात महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्विस रस्ते आहेत. उड्डाणपुलाखाली मोठी झाडे लावण्यात आली आहेत. काही नागरिक या झाडांमध्येदेखील सर्रास कचरा टाकतात. त्यामुळे तेथूनदेखील आता दुर्गंधी पसरण्यास सुरवात झाली आहे. (latest marathi news)

कारवाईची मागणी

संपूर्ण परिसरात आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी महापालिकेकडून प्रबोधनही केले जाते. परंतु कचरा टाकणारे याकडे पाठ फिरवून रात्री रस्त्यालगत कचरा टाकण्याचा प्रकार करतात. असे करणाऱ्या नागरिकांची महापालिका प्रशासनाने त्वरित दखल घेत कारवाई केली पाहिजे.

हा कचरा त्वरित स्वच्छ करावा अन्यथा शिवसेनेकडून सर्व कचरा गोळा करून आयुक्तांच्या दालनात टाकण्यात येईल, असा इशारा उपमहानगरप्रमुख नीलेश साळुंखे, आकाश काळे, शाखाप्रमुख साईनाथ घुले, योगराज गायकवाड, रवी अर्धापूर, मोहन हिवाळे, दिनेश थोरात, सविता भावसार, ज्योती अंभोरे, शैला दोरगे, विकास गवई आदींनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT