Sandalwood tree cut from Viraj Society. esakal
नाशिक

Nashik Crime News : रहिवासी वस्तीतील चंदनाची झाडे रात्रीतून गायब! इंदिरानगरला 15 फूट उंचीची झाडे बुंध्यापासून कापली

Nashik News : इंदिरानगर येथील पंधरा फूट उंचीचे चंदनाची झाडे रातोरात गायब करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इंदिरानगर येथील पंधरा फूट उंचीचे चंदनाची झाडे रातोरात गायब करण्यात आली आहे. शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या या परिसरातील पंधरा फूट उंचीची झाडे बुंध्यापासून कापण्यात आली. त्यानंतर त्यांची वाहतूकही झाली तरीही उद्यान विभाग व वन विभागाच्या निदर्शनास आले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (Indiranagar fifteen feet tall sandalwood trees were cut)

इंदिरानगर हा उच्चभ्रू वस्ती असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. विराज सोसायटी, सिमेन्स कॉलनी, गुरुगोविंद कॉलेज शेजारी ७० बंगल्याची साडेसात एकरात कॉलनी आहे. येथे अनेक चंदनाची झाडे आहे. अनमोल वृक्षांची जतन व्हावे म्हणून सोसायटीतील सर्व सभासद प्रयत्नशील आहे. सोमवारी (ता. २४) रात्री चंदन चोरांनी दोन झाडे कापून नेली आहे.

सदर झाडे सहा वर्षांपूर्वी लावण्यात आली होती. शासनाकडून जास्तीत जास्त वृक्षारोपण व संवर्धन करा यासाठी आवाहन व प्रोत्साहन नियमितपणे केले जाते. मात्र शहरातील अशा झाडांची तस्करी केली जात आहे. यावर संबंधित यंत्रणा व विभाग कोणतीही कार्यवाही करत नाही.याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

काही काही दिवसांपूर्वी अमृतधाम येथील हनुमान मंदिर परिसरातील झाडांची बुंध्याची साल काढून तेथे केमिकल लावले की ते झाड काही दिवसात निकामी होऊन कोलमडून पडायचे, अशी शक्कल वृक्ष तस्करांनी लावली होती. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोडस ऑपरेंडी वापरून वृक्ष झाडांचा नायनाट केला जात आहे. याचा खोलवर तपास केल्यास शहरातील व दुर्गम भागातील वन तस्करांचे रॅकेट उघडकीस येईल. (latest marathi news)

सखोल तपास गरजेचा

गेल्या काही दिवसात वन विभागामार्फत दुर्गम भागांमध्ये अवैध खैर वाहतूक प्रकरणी काही कारवाया केल्या आहे. सदर कारवाईतील अटक केलेले व चौकशीसाठी बोलविल्यांचे शहरात होत असलेल्या चंदन वृक्ष चोरीमध्ये काही कनेक्शन आहे का, हे तपासून बघणे आवश्यक आहे. मात्र वन विभागाकडून साग आणि चंदन झाडाच्या तस्करी विरोधातील कारवाईबद्दल काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. खैरपेक्षा चंदन व सागाची झाडे अधिक किमतीची आहे. जशी कर्तव्य तत्परता अवैध खैर वाहतूक प्रकरणी केली जात आहे. चंदन व सागाच्या झाडांबद्दलही झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

"आमच्या सोसायटीच्या परिसरात अनेक चंदनाची झाडे आहेत. योग्यरीतीने संवर्धन करण्यासाठी नियमितपणे त्यांची काळजी घेतो. इतकी वर्ष काळजी घेतल्यानंतर काही क्षणात जर झाडे गायब होत असतील हे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासनाने व संबंधित विभागाने अशा अपप्रवृत्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी." - यशवंत सिंह, चेअरमन विराज सोसायटी, सिमेन्स कॉलनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT