नाशिक

नाशिकच्या १५ उद्योगांना तैवानमधे निर्यातीची संधी

CD
पान २ अँकर ---------- नाशिकच्या १५ उद्योगांना तैवानमध्ये निर्यातीची संधी --- तैवानच्या अधिकाऱ्यांची सिन्नर, अंबड ‘एमआयडीसी’ला भेट सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : दोन दिवसांपासून नाशिकमध्ये आलेल्या तैवानच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता. ५) सिन्नर आणि अंबड औद्योगिक वसाहतींना भेट देत उत्पादनांची खात्री केली. रविवारी (ता. ४) झालेल्या सादरीकरणानंतर प्रथम टप्प्यावर १५ कारखान्यांची निवड केली असून, करारानंतर त्यांना आपला माल थेट तैवानला निर्यात करता येईल. अंबड इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा), नाशिक इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा), लघुउद्योग भारती आणि स्टार टेक अलायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये दोनदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. तैवानचे हेन्री, ‘आयमा’चे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, ‘निमा’चे अध्यक्ष आशिष नहार, ‘लघुउद्योग भारती’चे अध्यक्ष नितीन ढगे उपस्थित होते. सोमवारी तैवानच्या शिष्टमंडळाने सिन्नर ‘एमआयडीसी’ला प्रत्यक्ष भेट दिली. मंगळवारी (ता. ६) हे शिष्टमंडळ अंबड ‘एमआयडीसी’तील काही कंपन्यांना भेट देऊन त्यांचे उत्पादन तपासणार आहेत. दोन दिवसांच्या सादरीकरणानंतर नाशिकमधून साधारणतः १५ उद्योगांची निवड प्राथमिक टप्प्यावर झाली आहे. पुढील टप्प्यात यशस्वी झाल्यास नाशिकच्या उद्योजकांना आपले उत्पादन थेट तैवानला पाठविता येतील. या संपूर्ण प्रक्रियेत करारही करण्यात येतील. तसेच, तैवानचे अधिकारी कायमस्वरूपी येथे राहतील. त्यांच्या कार्यालयासाठी ‘आयमा’ जागा देणार असल्याने पुढील प्रक्रिया अधिक सुलभ होईल. … नाशिकमध्ये तैवानचे कार्यालय नाशिकमधील अंबड व सातपूरसह इतर ‘एमआयडीसी’मधील कारखान्यांतून थेट तैवानला निर्यात करता येणार आहे. यासाठी तैवानचे एक ते दोन अधिकारी हे थेट नाशिकला राहतील. ‘आयमा’ने त्यांना कार्यालय उभारण्यासाठी जागा दिल्याने त्याच ठिकाणी हे अधिकारी बसतील. निर्यातवाढीच्या संधी नाशिकच्या उत्पादकांमध्येच स्पर्धा करण्यापेक्षा देशाबाहेरील बाजारपेठेत आपला माल विकण्याची संधी यानिमित्त उपलब्ध झाली आहे. तैवानबरोबर करार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. निर्यातीला चालना मिळेल. - राजेंद्र पानसरे, अध्यक्ष, ‘आयमा’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

SCROLL FOR NEXT