leafy vegetable seller esakal
नाशिक

Nashik Vegetables Market : पालेभाज्यांची आवक निम्म्यावर; प्रतवारीनुसार बाजारभाव कमी-जास्त

Latest Nashik News : प्रतवारीनुसार बाजारभाव मिळत आहे. मात्र, फळभाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारभाव वधारले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : गेल्या तीन दिवसांपासून चांगलीच हजेरी लावणाऱ्या पावसाने सद्यस्थितीत उघडीप दिली असली तरी पालेभाज्यांची आवक ही पन्नास टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे प्रतवारीनुसार बाजारभाव मिळत आहे. मात्र, फळभाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारभाव वधारले आहेत. (Inflow of leafy vegetables on half)

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबादकडे पाठविला जातो. पाऊस व वाऱ्यामुळे फळभाज्यांमध्ये सध्या आवक घटली आहे.

बाजार समितीत रविवारी (ता.१३) झालेल्या लिलावात काकडी ११ ते १७ रुपये, दुधी भोपळा १२ ते २० रुपये, गिलके ३० ते ४० रुपये, कारले १० ते १५ रुपये, दोडका ३० ते ४२ रुपये, शिमला मिरची ६५ ते ९० रुपये, हिरवी मिरची ७० ते ९० रुपये, वाटाणा १०० ते १३० रुपये, वाल ५५ ते ७० रुपये, गवार २५ ते ३५ रुपये, घेवडा ५५ ते ७५ रुपये, गाजर २० ते ३० रुपये, वांगी ४० ते ६५ रुपये, भेंडी ३५ ते ४५ रुपये, टोमॅटो २८ ते ४५ रुपये प्रति किलो असे दर मिळाले. (latest marathi news)

किरकोळ विक्रेत्यांकडे हेच दर प्रतिकिलो तीस ते चाळीस रुपये वाढीव असतात. गावठी कोथिंबीर ५ ते ४३ रुपये, चायना कोथिंबीर २ ते ६० रुपये, मेथी २० ते ४२ रुपये, शेपू १०ते ३७ रुपये, कांदापात १५ ते ४३ रुपये जुडीला भाव मिळाला. तेच किरकोळ बाजारात जुडी छोटी करून दुप्पट दराने विक्री होत आहेत.

बाजारभाव वाढल्याची कारणे

- गेल्या तीन दिवसांपासून पावसाची उघडीप

- वादळ-वाऱ्यामुळे फळभाज्यांची फुलगळ

- परिणामी फळ उत्पादनात घट

- परिणामी आवक कमी होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

Mumbai News: ‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल! ८३ घरांच्या माध्यमातून मिळणार तब्बल ९६ कोटी रुपये

SCROLL FOR NEXT