kesar mango entered for sale at Gudipadwa. esakal
नाशिक

Nashik Mango News : फळांचा राजा अद्याप सामान्यांच्या आवाक्याबाहेर! अवकाळीमुळे आंब्याची आवक घटली; दर चढेच राहणार

Nashik News : गुढीपाडव्याला मोठी मागणी असणारा फळांचा राजा आंबा निफाड तालुक्यातील बाजारात हळुहळु दाखल व्हायला लागला असला तरी तो खाण्याचा मोह खवय्यांना आवरता घ्यावा लागणार आहे

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत : गुढीपाडव्याला मोठी मागणी असणारा फळांचा राजा आंबा निफाड तालुक्यातील बाजारात हळुहळु दाखल व्हायला लागला असला तरी तो खाण्याचा मोह खवय्यांना आवरता घ्यावा लागणार आहे. आंब्याचे माहेरघर असलेल्या कोकण व कर्नाटकात अवकाळी वातावरणाचा फटका आब्यांच्या बागांना बसल्यामुळे मुबलक प्रमाणात आंबा बाजारात यायला महिनाभराचा अवधी असल्याने आंब्याची आवक म्हणावी तशी झालेली नाही.

परिणामी, भाव वधारले असून खवय्यांच्या आवाक्याबाहेर असलेला आंबा आवाक्यात येणार की नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे खिशाचा अंदाज घेऊनच आंबे खरेदी करावे लागणार आहे. (Nashik Inflow of mangoes decreased due to bad weather Rates rise marathi news)

सध्या हापूस आंबा २५० ते ३०० रूपये डझन असून, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, ओझर, निफाड, लासलगाव येथे गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबे दाखल होत आहे. सध्या बाजारात हापूस, लालबाग, बदाम, केशर आंब्यांची आवक आहे. गुणवत्तेनुसार प्रतिकिलो २०० ते ३०० रूपये दर आहे. अद्याप पायरी, राजापुरी, गावराण, लंगडा, दशेरी आदी जातीच्या आंब्यांची आवक होत नसल्याचे फळविक्रेत्यांनी सांगीतले.

त्यांची आवक सुरू होण्यासाठी पंधरा दिवस ते महिनाभराचा अवधी आहे. आवक पुरेशी नसल्याने आंब्याचे दर तेजीत आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याला आंब्याचा रस चाखताना खिसा अधिक खाली करावा लागणार आहे. पिंपळगाव शहरात ठिकठिकाणी आंबा विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत.  (latest marathi news)

आंब्याचे दर (प्रतिकिलो)

हापूस : २५० ते ३०० रूपये

लालबाग : १५० रूपये

केशर : २०० रूपये

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सजली बाजारपेठ

साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त पिंपळगाव शहरातील बाजारपेठ सजली आहे. गुढीसाठी लागणारे नववस्त्र, हार-कडे, कलश, मिनी गुढीसह अन्य वस्तुंनी बाजारपेठ सजली आहे. अवघ्या एका दिवसावर गुढीपाडवा आल्याने बाजारपेठेत नवीन वस्तू खरेदीसाठी उधाण आले आहे. सोने, इलेक्टिक वस्तू, वाहने पाडव्याच्या मुहुर्तावर नोंदणीसाठी नागरिक शोरूमध्ये येत आहे. शहरात ठिकठिकाणी साखरेपासून बनविण्यात आलेले हार-कडे विक्रीसाठी आले आहे.

"सध्या आंब्याचे दर गुणवत्तेवर अवलंबून आहेत. कोकण व कर्नाटकातील हापूस आंब्याची आवक वाढते आहे. ग्राहक हापूस आंबा अधिक दर असूनही खरेदी करत आहेत. दर तेजीत असले तरी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबा खरेदीला ग्राहक प्राधान्य देत आहे."

- सचिन देव, फळविक्रेता, पिंपळगाव बसवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

SCROLL FOR NEXT