नाशिक

महापालिकेला नगर विकास समिती मंजूर

CD
मूलभूत सुविधांसाठी मनपास २० कोटींचा निधी मंजूर --------------- पश्चिम विधानसभा कार्यक्षेत्रात लाभ होणार ----------------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : शहरातील मूलभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी नगरविकास विभागाने नाशिक महापालिकेला २० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत हा निधी मिळणार असून, त्याचा वापर प्रामुख्याने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागांतील विकासकामांसाठी होणार आहे. --------------- सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पायाभूत सुविधांना गती मिळत असतानाच या निधीमुळे प्रभाग पातळीवरील नागरी सुविधांनाही चालना मिळणार आहे. सर्वांत मोठी तरतूद सदिच्छानगर येथील जलतरण तलावाच्या उर्वरित कामांसाठी करण्यात आली असून, त्यासाठी तब्बल १० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. त्याखालोखाल माहेरघर मंगल कार्यालय येथे पूल बांधण्यासाठी १.४० कोटी, इच्छामणी कॉलनीतील रस्ता काँक्रीटीकरणासाठी १ कोटी रुपयांची तरतूद आहे. कामटवाडे स्मशानभूमी विकास, सिंहस्थनगर व दत्त चौक येथील सामाजिक सभागृह, आनंदवल्ली येथील स्मशानभूमी व दशक्रिया शेड, श्रीरामनगर फुले मळा येथील खेळाचे मैदान, संभाजीनगर येथील सभामंडप, पवननगर मैदान येथील जॉगिंग ट्रॅक, सोमेश्वर कॉलनी व अहिल्याबाई होळकर चौक येथील सभामंडप, अश्विनीनगर येथील सभागृह, अंबड स्मशानभूमी विकास, सातपूर भाजी मार्केटमधील शौचालय, सोमेश्वर कॉलनीतील सामाजिक डोम, गणेश कॉलनीतील फरशी, वृंदावननगर, देवकीनंदन व वासुदेवानंद सोसायटीतील सभागृह, माधवनगर येथील जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिक संघ हॉलचे नूतनीकरण, डॅफोडिल्स सोसायटी, शिवनेरी चौक व पंडितनगर येथील मैदाने आणि श्रीकृष्ण चौक येथील सभामंडप या कामांचा समावेश आहे. संपूर्ण निधीचा भार राज्य शासन उचलणार असून अंमलबजावणी महापालिकेमार्फत होणार आहे. सर्व कामांसाठी ई-निविदा अनिवार्य असून खर्च वाढल्यास अतिरिक्त निधी मिळणार नाही. निधीचा योग्य वापर, कामांचा दर्जा आणि मंजूर कामांनुसारच खर्च होत असल्याची खातरजमा जिल्हाधिकाऱ्यांना करावी लागणार असून, कामांपूर्वी व नंतरची छायाचित्रे आणि त्रयस्थ लेखापरीक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Payal Jhambre Case : हुंडाबळी प्रकरणाचा तपास वेगवान; पायल झांबरे प्रकरणात ३५ तोळे सोने, मोबाईल व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात, पतीसह सासू-सासऱ्याच्या कोठडीत वाढ

Latest Marathi News Live Update: शरद पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते सिल्वर ओकवर; तीन तासांपासून बैठक

Gevrai Cylinder Blast Fire Accident News : गेवराईत दिवाळीत गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात चार जण गंभीर जखमी; चार घरे व दुचाकी जळून खाक, संजयनगर भागातील दुर्घटनेने सर्वत्र हळहळ

SCROLL FOR NEXT