Nashik ZP  esakal
नाशिक

Nashik ZP News : जिल्ह्यातील 10 हजार 325 जलस्रोतांची तपासणी; जि. प. पाणी व स्वच्छता विभागाची मोहीम

Nashik ZP : जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२५ जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२५ जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी १ एप्रिलपासून मोहीम सुरू झाली. ३० एप्रिलपर्यंत ही तपासणी मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेत जलस्रोतांच्या गुणवत्तेनुसार लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड ग्रामपंचायतींना दिले जाईल. (Nashik Inspection of 10 thousand 325 water sources in district by zp marathi news)

या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात १० हजार ३२५ स्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आरोग्य विभाग व जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष यांच्या समन्वयाने स्वच्छता सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. पाण्याचे स्रोत व अन्य बाबींसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वच्छता सर्वेक्षण केले जाते.

सर्वेक्षणाद्वारे ग्रामपंचायतींना लाल, हिरवे, पिवळे, चंदेरी कार्ड वितरित केले जाते. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत कार्यरत द्वितीय वैद्यकीय अधिकारी यांच्यावर या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. पाणी गुणवत्ता शाखेकडून शुद्ध निर्जंतुक पाणी ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता सर्वेक्षण राबविले जाते.  (latest marathi news)

सद्यस्थितीत जिल्ह्यात नळ पाणीपुरवठा योजनेचे चार हजार ६१३ हातपंप, पाच हजार ७१२ सार्वजनिक विहिरी असे एकूण १० हजार ३२५ जलस्रोत असून, या सर्व स्रोतांची तपासणी याद्वारे होणार आहे. अभियानांतर्गत १०० टक्के काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अभियान यशस्वीतेसाठी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.

अभियानात जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक यांच्या सहकार्याने गोळा करावयाचे आहेत. गोळा करण्यात आलेल्या पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांच्या उपविभागीय प्रयोगशाळांतून करण्यात येईल.

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचेही सर्वेक्षण

सदर अभियानाबरोबरच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रपत्र अ, ब, क तयार करून आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरविण्यात आले असून, त्याद्वारे स्रोतांचा परिसर, योजनेतील गळती, पाणी शुद्धीकरणाबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतीस पाणी गुणवत्तेविषयी जोखीम निश्चित करण्यात येणार आहे. त्या आधारे ग्रामपंचायतीस लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT