Inspection Committee of Bhusawal Mandal while inspecting Vikhroli station  esakal
नाशिक

Nashik News: विक्रोळी स्थानकाची भुसावळ निरीक्षण समितीकडून पाहणी! विकासकामांसाठी 19 कोटींचा निधी

Nashik News : समितीने यावेळी रेल्वे स्थानकात प्रवशांच्या सोयीसुविधांसाठी सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : भारतीय मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांचा कायापालट करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना सुरु केली असून त्यामध्ये मुंबई विभागातील १२ स्थानकांपैकी विक्रोळी येथे सुरु असलेल्या कामाची पाहणी भुसावळ मंडळातर्फे नेमलेल्या निरीक्षण समितीमार्फत करण्यात आली.

समितीने यावेळी रेल्वे स्थानकात प्रवशांच्या सोयीसुविधांसाठी सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यामध्ये नाशिक रोड येथील उपस्टेशन प्रबंधक (वाणिज्य) अमोल ठाकूर आदींसह माध्यम प्रतिनिधी सहभागी झाले होते. (Nashik Inspection of Vikhroli Station by Bhusawal Inspection Committee marathi news)

‘अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १५ स्थानकांचे विकास काम रेल्वेने हाती घेतले आहे. यांपैकी परळ, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भायखळा रेल्वे स्थानकांचे पुर्निविकास काम सुरु झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रवाशांचा राबता असलेल्या विक्रोळी स्थानकावरून मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या सोयीसाठी १९ कोटी ६० लाख रुपये खर्चाचे काम सुरु आहे.

पहिल्या टप्यातच स्थानकाचा पुर्नविकासचे काम रेल्वेने हाती घेतले असून या योजनेमध्ये आराखड्यानुसार स्टेशनवरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रवाशांचा प्रवेश दोन्ही बाजूने सुकर करणे, यामध्ये अंध व दिव्यांग बांधवांसाठी विशेष सोयी, नव्याने स्वच्छतागृहे उभारणी, आवश्यकतेनुसार लिफ्ट, एस्कलेटर,पार्किंग व स्वच्छता व्यवस्था,स्थानकाच्या सौंदर्यामध्ये भर घालणारी रचना, सर्व कार्यालये एकाच ठिकाणी नवी इमारत उभारणे अशी कामे प्रगतीपथावर आहे. या कामांचे निरीक्षण व पाहणी करणेकामी भुसावळ मंडळाने माध्यमांचे प्रतिनिधींसहपथकाने पाहणी केली. (Latest Marathi News)

यावेळी डीसीएम (कोचिंग) अमिषा, स्टेशन प्रबंधक मधू कौंजर, सीसीआय पवन कुमार यांनी पथकाचे स्वागत करत स्थानकात नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती देत प्रत्यक्ष सुरु असलेल्या कामाची पाहणी करत विविध सूचनाही केल्या. त्यानंतर समितीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला देखील भेट दिली.

यावेळी वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी समितीस ‘धरोहर दीर्घा’ या रेल्वेचा इतिहास सांगणाऱ्या संग्रहालयात घेऊन जात संग्रहालयाचे व्यवस्थापक स्वप्नील जाधव यांनी टर्मिनल उभारणी मागचा इतिहास व रेल्वेच्या दोनशे वर्षांपूर्वी वापरात असलेल्या विविध उपकरणे व साहित्याविषयी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

Bank Job : मोठा निर्णय! तुमच्या जिल्ह्यातल्या बँकेत तुम्हाला मिळणार नोकरी! ७० टक्के जागा रहिवाशांसाठी राखीव, कसा करायचा अर्ज? पाहा

KYC Problem: केवायसी करायला, डोंगरावर चला! मोबाइल नेटवर्क शोधण्यासाठी कळंकीतील नागरिकांची धावपळ

Latest Marathi News Live Update : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT