Janabai Binnar esakal
नाशिक

Inspirational Story : आदिवासी महिलांसाठी बिन्नर बनल्या समाजशिक्षिका

Nashik News : आदिवासी भागातील महिलांना ‘चूल आणि मूल’ या चाकोरीतून बाहेर काढतानाच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून बचतगट स्थापन करतानाच हजारो आदिवासी महिलांसाठी समाजशिक्षिका बनल्या, त्या टाके हर्ष येथील उपसरपंच जनाबाई बिन्नर...

विजयकुमार इंगळे

समाज माणसाला घडवतो, ज्या समाजाने आपल्याला जन्माला घातले, त्या समाजाचंही आपण काही देणं लागतो, या भावनेतून अनेक जण सामाजिक जाणीव ठेवून समाजऋणातून उतराई होण्यासाठी प्रयत्नशील असतात. आयुष्याची सकारत्मक पाऊलवाट भक्कम करतानाच सामाजिक जाणीव तसेच शेतकरी कुटुंबातील जबाबदाऱ्यांमुळे आठवीत असतानाच शाळेकडे पाठ फिरली... कुटुंबाचा भाग होतानाच लहानपणीच शेतावर जावे लागले.

शिक्षणापासून वंचित राहावे लागल्याची सल मनात कायम होती. शिक्षण जरी कमी असले तरी जिद्दीच्या जोरावर महिलांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी ती सरसावली. आदिवासी भागातील महिलांना ‘चूल आणि मूल’ या चाकोरीतून बाहेर काढतानाच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून बचतगट स्थापन करतानाच हजारो आदिवासी महिलांसाठी समाजशिक्षिका बनल्या, त्या टाके हर्ष येथील उपसरपंच जनाबाई बिन्नर... (Inspirational story janabai binnar from take harsh news)

जनाबाई निंबा बिन्नर... शिक्षण केवळ आठवी पास... माहेर ढोकळी (जि. अहमदनगर) येथील, तर सासर टाके हर्ष (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील. दादाभाऊ केरू करवर यांचा पत्नी सुमनाबाई यांच्यासह दोन मुले, चार मुली असा मोठा परिवार... परिवाराला पुढे नेताना शेतीशिवाय पर्याय नव्हता.

करवर कुटुंबात जनाबाई या ज्येष्ठ कन्या... अभ्यासात हुशार असूनही घरच्या जबाबदाऱ्यांमुळे केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आले. करवर कुटुंब शेतात राबत असल्याने लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी जनाबाई यांच्यावर येऊन पडल्याने त्यांचे अर्ध्यावरच शिक्षण सुटले. कुटुंबाची जबाबदारी कमी व्हावी, यासाठी वडिलांनी जनाबाईंचा विवाह लवकर करून दिला. त्यामुळे त्यांचे माहेरही सुटले.

पतीने दिले भक्कम बळ

विवाहानंतर सासरी टाके हर्ष येथे शेतकरी कुटुंबात जनाबाई रममाण झाल्या. मात्र विकासापासून दूर असलेल्या टाके हर्ष आणि परिसरातील आदिवासी महिलांना अंधश्रद्धा, अज्ञान यातून बाहेर काढण्याबाबतचा विचार त्यांनी पती निंबा बिन्नर यांना बोलून दाखवला. सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेल्या निंबा बिन्नर यांनी त्यांना प्रोत्साहन देताना ते खंबीरपणे उभे राहिले.

आदिवासी महिलांचे संघटन करायचे असेल, तर बचत गटांच्या माध्यमातूनच हे शक्य आहे, याची त्यांना कल्पना आली होती. ‘चूल आणि मूल’ या चाकोरीतून महिलांना बाहेर काढण्यासाठी गाव व परिसरातील महिलांना बचतीचे महत्त्व सांगतानाच आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्या वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिल्या.

प्रारंभी स्वतःचा बचतगट स्थापन करतानाच गावात सुमारे २२ बचतगट त्यांनी स्थापन केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी प्रभागात सुमारे एक हजार ८०० बचत गटांच्या स्थापनेत जनाबाई बिन्नर यांचे योगदान मोलाचे ठरले. (Latest Marathi News)

आदिवासी महिलांचे संघटन मोलाचे

बचतगट स्थापन करण्याबरोबरच परिसरातील महिलांना दारूबंदी, बालविवाह, अंधश्रद्धा तसेच सामाजिक जबाबदारी या विषयांवर पंचक्रोशीतील महिलांमध्ये जनजागृती करण्यात जनाबाई बिन्नर यांनी दिलेला सहभाग मोलाचा ठरला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुमारे अठरा हजार महिलांना सामाजिक प्रवाहात आणतानाच बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच शासनाच्या उमेद अभियानाच्या प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याबरोबरच बचत गटांचे व्यवसाय सुरू करण्यावर त्यांनी भर दिला. परिसरातील महिलांची रोजगाराची गरज ओळखून कुक्कुटपालन, शेळीपालन यासोबतच गृहउद्योगांकडेही लक्ष पुरवले. आदिवासी समाजासाठी शासनाच्या योजनांना प्रभावीपणे राबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

उद्योगांची साखळी केली भक्कम

टाके हर्ष आणि परिसरातील अंजनेरी प्रभागातील बचत गटांसाठी शासनातर्फे भरवण्यात येणाऱ्या विक्री प्रदर्शनात आदिवासी महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना विक्रीसाठी नेण्याबरोबरच महिलांसाठी मिरची कांडप, पीठगिरणी यासोबतच रोपवाटिका, गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प, कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय उमेद अभियानाच्या माध्यमातून सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. बचतीचे महत्त्व पटविण्याबरोबरच आदिवासी समाजात प्रबोधन करण्यात जनाबाई यांचा सहभाग मोलाचा ठरला. आदिवासी महिलांसाठी काम करण्याबरोबरच उपसरपंच म्हणूनही त्या आपले योगदान देताहेत.

खचून जाऊ नका

कुटुंबाला भक्कम करायचे असेल, तर आहे त्या परिस्थितीला सामोरे जात प्रयत्न सुरू ठेवले, तर नक्कीच यश मिळते, असे सांगतानाच हजारो महिलांसाठी आधार होतानाच बचत गटांची चळवळ भक्कम करत परिस्थितामुळे शिक्षण अर्ध्यावरच सुटलेल्या जनाबाई यांना पती निंबा बिन्नर, ‘उमेद’चे अधिकारी संदीप सिसोदिया, सुशील चौधरी, निरेश शिर्के यांच्यासह जिल्हा परिषदेचे सहकार्य मिळाल्यामुळेच आदिवासी महिलांसाठी आधार बनलेल्या जनाबाई यांनी ‘समाजशिक्षिका’ म्हणून दिलेले योगदान नक्कीच खचलेल्या मनांसाठी उभारी देणारे ठरतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT