Onion Market (file photo) esakal
नाशिक

Nashik Onion News : जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची चौकशी; बेकायदा लिलावचा आरोप

Nashik News : कांदा व्यापाऱ्यांनी खासगी जागेत सुरू केलेल्या कांदा लिलाव प्रकरणी सोमवारी (ता.१५) जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या १२ पथकांनी ठिकठिकाणी जात चौकशी करत तपासणी केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचलित पद्धतीने कांदा खरेदीचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलेले आदेश धुडकावत कांदा व्यापाऱ्यांनी खासगी जागेत सुरू केलेल्या कांदा लिलाव प्रकरणी सोमवारी (ता.१५) जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या १२ पथकांनी ठिकठिकाणी जात चौकशी करत तपासणी केली. त्यामुळे व्यापाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष केंद्रित झाले आहे. (Nashik Investigation of onion traders in district Allegations of illegal auction)

पणन विभाग व संबंधित बाजार समितीची कोणतीही परवानगी न घेता जिल्ह्यामध्ये लासलगाव (ता. निफाड), बागलाण, वणी (ता. दिंडोरी), उमराणे (ता. देवळा), सायखेडा (ता. निफाड), नांदगाव, चांदवड, कळवण, देवळा, मनमाड (ता. नादगांव), अंदरसूल (ता. येवला) व नायगाव (ता. सिन्नर) येथे व्यापारी असोसिएशन पुरस्कृत खासगी जागेवर शेतमाल लिलाव सुरू केले.

विनापरवानगी सुरू झालेली ही केंद्रे बेकायदा असून, त्यावर कारवाईसाठी तक्रार अर्ज व निवेदने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यामुळे या चौकशीसाठी जिल्ह्यात १२ पथके नियुक्त करण्यात आली होती. सोमवारी (ता.१५) या पथकांमधील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील काही खासगी खरेदी केंद्रांची तपासणी करून नोंदी घेण्यात आल्या. (latest marathi news)

समितीलाच प्रतिप्रश्‍न

चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीचे अधिकारी कांदा खरेदी केंद्रांवर माहिती घेण्यासाठी पोचले असता आमच्यावरच असा अन्याय का, त्यानंतर आम्ही आपल्या भावना जाणून घेण्यासाठी आलो आहोत, असे समितीच्या सदस्यांनी सांगितल्यानंतर शेतकऱ्यांचा काहीसा रोष कमी झाला.

या मुद्यांच्या आधारे तपासणी

-शेतमाल खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यासाठी संबंधितांकडे वैध परवाना आहे का?

-शेतमाल खरेदी विक्री केंद्रातील खरेदीदार-व्यापारी यांच्याकडे वैध परवाना आहे का?

-तपासणी तारखेअखेर या केंद्रावर झालेली एकूण शेतमाल खरेदी.

- खरेदीदार-व्यापारी यांनी बाजार फी, देखरेख खर्च भरणा केलेला आहे का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT