NMC Nashik  esakal
नाशिक

Nashik NMC : जाहिरात होर्डिंग्ज परवानगीत अनियमितता; तारांकित प्रश्नावर महापालिका प्रशासनाची कबुली

Nashik News : शहरामध्ये जाहिरात होर्डिंग्जला परवानगी देताना अनियमितता झाल्याची कबुली महापालिका प्रशासनाने विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरामध्ये जाहिरात होर्डिंग्जला परवानगी देताना अनियमितता झाल्याची कबुली महापालिका प्रशासनाने विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शहरातील होर्डिंग घोटाळ्या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. (Irregularity in permission for advertisement hoardings)

महापालिकेकडून शहरातील खुल्या जागांवर जाहिरात होर्डिंग उभारण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदेत २८ खुल्या जागांवर जाहिरात फलक उभारण्यासाठी देकार मागविण्यात आले. निविदित पात्र ठरलेल्या मक्तेदाराला कार्यारंभ आदेश देताना मात्र करारात बदल करण्यात आला.

खुल्या जागांसह रस्ते, वाहतूक बेटे, दुभाजक, इमारती, उद्याने वापरात असलेल्या व नसलेल्या जागा, बांधीव मिळकतींवर जाहिरात फलक उभारण्याची परवानगी देण्यात आली. निविदेमध्ये फक्त जाहिरात फलक असा उल्लेख असताना प्रकाशित फलक, युनिपुल एलईडी वॉल अशा सर्वांना परवानगी देण्यात आली.

या माध्यमातून महापालिकेचा करोडो रुपयांचा कर बुडाल्याचा आरोप नाशिक आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने केला होता. आरोपानंतर अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती चौकशीसाठी गठित करण्यात आली. परंतु समितीचा अहवाल अद्यापपर्यंत खुला झाला नाही व संबंधितांवर कारवाईदेखील केली गेली नाही. (latest marathi news)

या सर्व प्रकारात महापालिकेच्या घरपट्टी विभागात सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अभय देण्यात आले. महापालिका पातळीवर अहवाल गुपित ठेवण्यात आला असला तरी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून होर्डिंग घोटाळ्यासंदर्भात माहिती विचारली त्यावर प्रशासनाने उत्तर दिले.

ठेकेदाराला नोटीस

संबंधित ठेकेदाराला २८ होर्डिंगचे काम देताना प्रकाशित फलक, युनिपुल एलईडीचा समावेश करण्यात आल्याची कबुली देण्यात आली. त्याचबरोबर अतिरिक्त युनिपोल होर्डिंगचा कर भरण्याचा दावादेखील करण्यात आला. संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे उत्तरात स्पष्ट करण्यात आले. मात्र अनियमिततेची कबुली देताना महापालिकेचे कुठलेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचेदेखील लेखी उत्तर देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT