Shinde group's district chief Ajay Boraste said in a meeting to demand that Shiv Sena get the Nashik Lok Sabha seat. Neighbors Anil Dhikle, Kashinath Mengal, Municipal Chief Praveen Tidme, Lok Sabha Organizer Yogesh Mhaske, Yuva Sena Extension Yogesh Beldar, Upazila Chief Sudam Demse etc. esakal
नाशिक

Lok Sabha Election : शिंदे गट पुन्हा आक्रमक, मुंबईला धाव; ‘नाशिकची जागा ‘धनुष्यबाणालाच’चा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह

Lok Sabha Election : महाविकास आघाडीचा नाशिक लोकसभेचा उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर महायुतीतील तिढा अद्यापही कायम आहे.

सकाळ वृत्तसेवा

Lok Sabha Election : महाविकास आघाडीचा नाशिक लोकसभेचा उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर महायुतीतील तिढा अद्यापही कायम आहे. नाशिकची जागा भाजपला की शिवसेनेच्या शिंदे गटाला, यावर निर्णय होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. दोघांत तिसरा आल्याने शिवसेनेचा शिंदे गट पुन्हा आक्रमक झाला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी धाव घेत नाशिकची जागा धनुष्यबाणालाच मिळावी, असा आग्रह धरण्यात आला. (nashik it is insisted that Dhanushyabana should get seat of Nashik by Shiv Sainik marathi news)

नाशिकची जागा शिवसेनेलाच सोडण्यावर शिवसेना पदाधिकारी ठाम आहेत. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या मायको सर्कल येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी नाशिकमधून दोन टर्म शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा होता आणि भविष्यातही शिवसेनेचाच राहील. नाशिकची जागा नक्की कोण लढविणार? यावरून विविध चर्चा घडून येत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. (latest marathi news)

रविवारी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले, त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या जागेसंदर्भात शिवसैनिकांना आश्‍वासित केले. जागा शिवसेनेलाच सोडण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आग्रही असल्याचे सांगितले. असे असताना शिवसेनेचा नाशिकवरचा दावा जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसैनिक पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडकले आहेत.

बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, काशीनाथ मेंगाळ, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, लोकसभा संघटक योगेश म्हस्के, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, श्याम साबळे, दिगंबर मोगरे, भाऊसाहेब निकम, शिवाजी भोर, माजी नगरसेवक रमेश धोंगडे, महिला आघाडी महानगरप्रमुख अस्मिता देशमाने, युवसेना जिल्हाप्रमुख रूपेश पालकर, विधानसभाप्रमुख विनायक आढाव, रोशन शिंदे, श्याम खोले, उपमहानगरप्रमुख आनंद फरताळे, नितीन साळवे, आकाश पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांनो सावधान! आठव्या वेतन आयोगाच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम; सरकारकडून आवाहन

Mumbai Viral Video: मुंबईत 2BHK फ्लॅटचं भाडं किती, इन्फ्लुएंसर तरुणीने सांगितला थक्क करणारा आकडा

Pune Crime : आरोपींची भूमिका गौण असल्याचा दावा दिशाभूल करणारा, शरद मोहोळ खून प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तिवाद; चार आरोपींचा जामिनासाठी अर्ज

खरे मूर्ख तर आम्ही... अंकिता वालावलकरने सांगितली सुरजची स्ट्रॅटेजी; त्याने स्वतःला मुद्दाम गरीब दाखवलं...

Maharashtra SSC Exam 2026: दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात; विद्यार्थ्यांनो, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

SCROLL FOR NEXT