summer temperature esakal
नाशिक

Summer Heat : मार्चमध्येच पाऱ्याने ओलांडली पस्‍तीशी, उन्‍हाच्‍या झळा सोसवे ना, दुपारच्‍या उकाड्याने शहरवासीय त्रस्‍त

Summer Heat : मार्चमध्येच त्‍याची झलक बघायला मिळत असून, आत्ताच कमाल पाऱ्याने ३५ अंश सेल्‍सिअसचा टप्पा ओलांडलेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Summer Heat : नुकताच झालेल्‍या हिवाळी हंगामात फारसा गारठा जाणवला नसला तरी यंदाच्‍या उन्‍हाळा मात्र लाहीलाही करणारा ठरणार आहे. मार्चमध्येच त्‍याची झलक बघायला मिळत असून, आत्ताच कमाल पाऱ्याने ३५ अंश सेल्‍सिअसचा टप्पा ओलांडलेला आहे. उन्‍हाच्‍या झळा सोसवेना झालेल्‍या असून, दुपारच्‍या वेळी नाशिककर उकाड्याने त्रस्‍त होत असल्‍याचे बघायला मिळते आहे. गेल्‍या काही महिन्‍यांपासून मोठ्या प्रमाणात वातावरणीय बदल अनुभवायला मिळत होते. (nashik It is seen that Nashikkar is suffering from heat in afternoon marathi news)

अवकाळी पावसाच्‍या तडाख्याचा अनुभवदेखील अनेक वेळा आला. दरवर्षीच्‍या अपेक्षेप्रमाणे यंदा थंडी मात्र जाणवली नव्‍हती. अशात उन्‍हाळी हंगामाला सुरवात झालेली असताना, आत्तापासून उन्‍हाच्‍या तीव्र झळा नाशिककरांची परीक्षा घेत आहेत. ११ मार्चला यंदाच्‍या हंगामातील उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झालेली असून, यादिवशी ३५.८ अंश सेल्‍सिअस इतके कमाल तापमान नोंद झाले होते. मार्चमध्येच अशी परिस्‍थिती आहे, तर एप्रिल आणि मे महिन्‍यात काय हाल होतील, अशी चर्चा आता नाशिककरांमध्ये रंगते आहे.

दुपारी जनजीवन प्रभावित

सायंकाळनंतर वातावरणात काही प्रमाणात थंड हवा जाणवत असली तरी दिवसभर उकाड्याने नाशिककरांचे हाल होत आहेत. त्‍यातच दुपारी बारा ते तीनच्‍या दरम्‍यान सूर्याची प्रखर किरणांपासून बचावासाठी अनेक जण घर, कार्यालयाबाहेर पडण्याचे टाळताना दिसत आहेत. त्‍यामुळे दुपारच्‍या वेळी बाजारपेठा ओस पडू लागल्‍या असून, जनजीवन प्रभावित होत असल्‍याचे बघायला मिळते आहे. (latest marathi news)

गेल्‍या काही दिवसांतील नाशिकचे नोंदविले गेलेले कमाल तापमान

तारीख कमाल तापमान

१० मार्च ३५.४

११ मार्च ३५.८

१२ मार्च ३५.३

१३ मार्च ३३.८

१४ मार्च ३३.३

१५ मार्च ३३.७

१६ मार्च ३४.२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT