While giving information in a press conference at Nine Pearls Hospital, Director Dr. esakal
नाशिक

Nashik News : नाईन पर्ल्स हॉस्‍पिटलमध्ये आयव्‍हीयुएस, एफएफआर तंत्रज्ञान

Nashik : या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अँजिओप्लास्टी करत रुग्‍णांना दिलासा मिळणार असल्‍याचे संचालकांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील नाईन पर्ल्स हे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आयव्‍हीयुएस, एफएफआर तंत्रज्ञानाने सुसज्‍ज झाले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अँजिओप्लास्टी करत रुग्‍णांना दिलासा मिळणार असल्‍याचे संचालकांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. हॉस्‍पिटलच्‍या या कामगिरीविषयीची माहिती पत्रकार परिषदेत संचालक डॉ. शीतलकुमार हिरण, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. नागेश अघोर, डॉ. दिनेश वाघ, डॉ. धनंजय डुबेरकर, डॉ. विनायक शेणगे, डॉ. योगेश चौधरी, डॉ. हुसेन बोहरी, हॉस्पिटल केंद्रप्रमुख जॉन प्रिजू यांनी दिली. (Nashik IVUS and FFR technology at Nine Pearls Hospital marathi news)

डॉ. हिरण म्‍हणाले, की हृदयाच्या आजाराचे प्रमाण वाढत असून, त्यात गुंतागुंतीचे हृदयविकार वाढत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान काळाची गरज बनली असून, नाईन पर्ल्स हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागाचे तज्ञ डॉक्टर्स यांनी आयव्‍हीयुएस/एफएफआर तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. नुकतेच निघालेले आयव्‍हीयुएस तंत्रज्ञान सध्या प्रचलित असून याव्दारे प्रत्यक्षात ब्‍लॉकेजेस असलेल्‍या धमनीमधील दृश्य दिसते. (latest marathi news)

त्यावर योग्य उपचार प्रणाली वापरून केलेली अँजिओप्लास्टी परिणामकारक ठरते. विदेशात हे तंत्रज्ञान प्रत्येक अँजिओप्लास्टीसाठी वापरले जाते. आपल्याकडे खूप कॅल्सिफाईड आणि जटिल ब्लॉकेजेससाठी किंवा इन्स्टेट रीस्टेनोसिस (स्टेंटमध्ये आलेला ब्लॉकज) अशा प्रकारच्या रुग्णांना उपचार पद्धतींचा उपयोग करून अँजिओप्लास्टी केल्यास चांगले परिणाम मिळतात.

रुग्णावर अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्‍त्रक्रियेची गर आहे की नाही, यासाठी फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह (एफएफआर) तंत्रज्ञानाद्वारे केलेली तपासणी सहाय्य करते. त्‍यामुळे काही रुग्‍णांची अँजिओप्‍लास्‍टी, बायपास टाळून औषधोपचारातून यशस्‍वी उपचार करता येऊ शकतात, अशी माहिती इंटरव्हेशननल कार्डिओलॉजिस्ट व संचालक डॉ. शीतलकुमार हिरण, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. सचिकुमार पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT