नाशिक

दिवाळी अंक लेख : रिसॉर्ट संस्कृतीला पर्यटकांची पसंती

CD
१५ वा लेख नाशिक, जळगावमधील पर्यटकांची पसंती ---------------------------------- पर्यटनातील नवा केंद्रबिंदू : ‘रिसॉर्ट संस्कृती’ सह्याद्री दऱ्या-खोऱ्यांपासून ते सातपुड्याच्या पर्वतरांगांपर्यंत विस्तीर्णपणे पसरलेल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये पर्यटन अधिक बहरले आहे. काळानुरुप पर्यटनाच्या परिभाषा बदलत असताना नाशिक व जळगाव या प्रमुख शहरांमधील रिसॉर्ट संस्कृती पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. दैनंदिन दिनचर्येतून काहीकाळ मानसिक शांतता व आरामदायी जीवनासह कुटुंबासमवेत वेळ व्यतित करण्याची संधी मिळत असल्याने पर्यटकांची पावले रिसॉर्टकडे वळत आहेत. - गौरव जोशी विविधतेने नटलेल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात पर्यटन क्षेत्रात रिसॉर्ट संस्कृती नावारूपास आली आहे. धरण, जंगल परिसर, नदीकाठ तसेच गड-किल्ल्यांच्या पायथ्याशी नवनवीन रिसॉर्ट उभी राहत आहेत. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरी तसेच शेजारील नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वरसोबत पेठ-सुरगाणा या आदिवासीबहुल तालुके तसेच जळगाव जिल्ह्यातही रिसॉर्ट पर्यटनाचे जाळे अधिक घट्ट झाले आहे. या रिसॉर्ट पर्यटनामध्ये कुटुंब किंवा मित्रपरिवाराच्या दृष्टीने आकर्षक पॅकेज उपलब्ध करून दिली जात आहे. एका दिवसासाठी साधारणतः ५ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत या पॅकेजचे दर आहेत. या पॅकेजेसमध्ये ऑल-इन-वन सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे वीकेंडला सुनियोजित, सुरक्षित तसेच मनाचा थकवा दूर करणाऱ्या या रिसॉर्ट पर्यटनाचा सहकुटुंब किंवा मित्र परिवारासह आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वळत आहेत. विशेषतः मुंबई-पुण्याकडील पर्यटनाचा क्लाऊड तसेच स्थानिक पातळीवरील पर्यटकांचाही यात अधिक समावेश पाहायला मिळतो. रिसॉर्ट पर्यटनच का? पर्यटन क्षेत्रात नावारूपास आलेल्या रिसॉर्ट संस्कृतीमध्ये पर्यटकांना आवश्‍यक सर्व सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे पर्यटकांना छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी इतरत्र जावे लागत नाही. या सुविधांमध्ये प्रामुख्याने कुटुंबाची सुरक्षिततेवर भर दिला जात आहे. त्यामुळे पर्यटकही एक-दोन दिवस बिनधास्तपणे रिसॉर्टमध्ये रमताना दिसून येत आहेत. फॅमिली पिकनिक, गेट-टु-गेदर शहरांमधील धकाधकीच्या जीवनापासून थोडे दूर निर्सगाच्या सांनिध्यात जाण्यासाठी शॉर्ट ट्रिप्स्‌ची संकल्पना रूढ झाली आहे. विशेष करून वीकेंड किंवा जोडून सुट्या आल्यास अशा ट्रिप्सचे प्लॅनिंग आखले जाते. या माध्यमातून फॅमिली पिकनिकच्या उद्देशाने सर्व कुटुंब एक-दोन दिवस एकत्रित येते. तसेच बर्थ-डे, फॅमिलीतील गेट-टु-गेदर साजरे करण्यासाठी पर्यटकांची रिसॉर्टला पसंती मिळते आहे. खव्वयांची रेलचेल चोेखंदळ खव्वयांच्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी रिसॉर्ट व्यवस्थापन पुरेपूर काळजी घेते. एकदा ग्रुप बुकिंग झाल्यानंतर सकाळच्या चहा-कॉफी व नाश्‍त्यापासून ते दुपारचे जेवण, संध्याकाळच्या हाय टी तसेेच रात्रीच्या जेवणापर्यत विविध मेन्यू उपलब्ध करून दिले जातात. त्यामध्ये व्हेज व नॉनव्हेज खवय्यांसाठी खास त्यांच्या पसंतीचे मेन्यूची रेलचेल असते. त्यामुळे पर्यटकांनाही त्यांच्या आवडीच्या जेवणाचा मनस्वी आनंद घेता येत आहे. इनडोअर गेम्स आनंदपर्वणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रिसॉर्ट व्यवस्थापन विविध आघाड्यांवर कार्यरत आहेत. त्याचाच भाग म्हणून पर्यटकांसाठी रिसॉर्टमध्ये इनडोअर गेम्सची निर्मिती करण्यात येते. लहान मुलांपासून ते युवा वर्ग तसेच ज्येष्ठांना डोळ्यासमोर ठेवून या खेळांची आखणी केली जाते. साधरणपणे कॅरम, बुद्धीबळापासून ते निरनिराळ्या करमणुकीच्या साधनांचा त्यामध्ये समावेश केला जातो. एवढेच नव्हे तर स्वीमिंग पुल, झिपलाईन्स्‌सारखे करमणुकीच्या सुविधांही उपलब्ध आहेत. या सुविधांमध्ये पर्यटक रममाण होत असून मनाला आनंद देणारे हे गेम्स पर्यटकांसाठी आनंदपर्वणी ठरत आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना रिसॉर्ट पर्यटनामध्ये पर्यटकांसाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा स्थानिक पातळीवरूनच उपलब्ध करून दिल्या जातात. दूध व दुग्धजन्य पदार्थापासून ते भाजीपाला तसेच अन्य उपयुक्त साहित्याचा त्यात समावेश आहे. याशिवाय रिसॉर्ट परिसरातच ग्रामीण भागातील बचतगटांची उत्पादने तसेच हस्तकला वस्तूंचे दालनही उभारण्यात येत आहेत. पर्यटक मनमुराद खरेदी करत असल्याने या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना लाभत आहे. युवकांना रोजगार रिसॉर्ट व्यवस्थापनातर्फे परिसरातील छोटे-मोठे ट्रेक, जवळची धार्मिक तसेच प्रेक्षणीय स्थळांची सफर घडविण्यात येते. त्यामुळे पर्यटकांनाही स्थानिक संस्कृती, इतिहास, धार्मिक स्थळांचे महत्त्व याची संपूर्ण माहिती मिळते. विशेष म्हणजे रिसॉर्ट व्यवस्थापनातर्फे त्यासाठी स्थानिक युवकांची मदत घेतली जात आहे. या माध्यमातून युवकांना रोजगाराचा नवीन मार्ग सापडला आहे. मानसिक शांतता, वेलनेस शहरांमधील प्रदूषण व कोलाहलापासून काहीसे दूर निसर्गाच्या सांनिध्यात वेळ घालविणे हे आजच्या काळातील नवी संकल्पना रूढ झाली आहे. या संकल्पनेला रिसॉर्ट टुरिझमची जोड लाभली आहे. याच रिसॉर्ट पर्यटनामध्ये आता पुढील टप्यात पर्यटकांसाठी योग किंवा स्पा थेरपीसारखे उपक्रम राबविले जात आहे. शारीरिक व मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी ही थेरपी उत्तम असल्याने पर्यटकांचा कल त्याकडे वाढला आहे. दरम्यान, काही पर्यटक हे डेली रुटीनमधून काहीस बदल म्हणून रिसॉर्ट बुक करतात. पर्यटक या रिसॉर्टमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात तसेच पक्षांच्या किलबिलाटात कार्यालयीन कामकाज आवडीने पूर्ण करतात. पर्यटकांचे मनोरंजन रिसॉर्टमध्ये इनडोअर गेम्ससह मनोरंजनाच्या विविध सुविधाही आज उपलब्ध आहेत. त्यामध्ये संगीत पासून ते करा-ओकेसारख्या सुविधांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त स्थानिक कलाकारांच्या सहाय्याने संगीताचे छोटे-मोठे कार्यक्रमही आखले जातात. या कार्यक्रमांमधून पर्यटकांनाही त्यांच्यातील कलागुण सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असते. या माध्यमातून पर्यटकांचे मनोरंजन साधले जात असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर सरतेशेवटी आनंदाचे भाव निर्माण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT