MLA Nitin Pawar esakal
नाशिक

Nashik News: जामशेत लघुपाटबंधारे प्रकल्प योजनेला मंजुरी! तालुक्यातील 227 हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

Nashik News : योजनेला मान्यता मिळताच अभोणा चौफुलीवर जामेशत परिसरातील शेतकऱ्यांनी जल्लोष केला.

सकाळ वृत्तसेवा

कळवण : तालुक्यातील जामशेत लघुपाटबंधारे प्रकल्प योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली. या योजनेमुळे तालुक्यातील २२७ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली येणार आहे. योजनेला मान्यता मिळताच अभोणा चौफुलीवर जामेशत परिसरातील शेतकऱ्यांनी जल्लोष केला. (Nashik Jamshet Small Irrigation Project Plan Approved An area of ​​227 hectares in taluka will come under irrigation marathi news)

दिवंगत आमदार ए.टी.पवार यांनी २०११ मध्ये नाशिकच्या नियोजन व जलविज्ञान कार्यालयाकडून जामशेत लघुपाटबंधारे प्रकल्पास पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळवून जामशेत लघुपाटबंधारे प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.

मागील १३ वर्षांपासून जामशेत लपा योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित होता. याबाबत आमदार नितीन पवार यांनी ओतूर बरोबर जामशेत लपा योजना संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेऊन या योजनेचे महत्त्व लक्षात आणून दिले होते. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला तत्काळ अहवाल सादर करून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शासनस्तरावरील अटी पूर्तता करीत सदरचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.२६) झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे तालुक्यातील जामशेत, मोहमुख, अंबुर्डी बुद्रूक, अंबुर्डी खुर्द, भगूर्डी, दत्तनगर या परिसराला शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

"जामशेत लपा प्रकल्पाचे स्व. ए. टी. पवार यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करावयाचे असल्यामुळे या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठका घेतल्या. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे."

- नितीन पवार, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT