नाशिक

जेसीबीच्या धक्क्याने पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया

CD
फोटो : A14952 नाशिक : जेसीबीच्या धक्क्याने फुटलेली पाइपलाइन त्यातून वाया जाणारे पाणी -- जेसीबीच्या धक्क्याने पाइपलाइन फुटली जुने नाशिक, ता. ५ : जेसीबीच्या धक्क्याने पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेल्याची घटना सोमवारी (ता. ५) सायंकाळी मुलतानपुरा भागात घडली. संपूर्ण परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर पाण्याची गळती थांबली. रात्री उशिरापर्यंत पाइपलाइनचे काम केले नसल्याने कर्मचारी फुटलेली पाइपलाइन सोडून निघून गेल्याचे चित्र बघावयास मिळाले. सोमवारी महापालिका रुग्णालयाजवळील रस्त्याचे खोदकाम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने येथील जुनी पाइपलाइन फुटली. सायंकाळचा पाणीपुरवठा सुरू असल्याने पाइपलाइन मधून हजारो लिटर पाणी रस्त्यांवर वाया गेले. ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. सायंकाळचा पाणीपुरवठा बंद होत नाही तोपर्यंत पाणी वाया जाण्याचा प्रकार सुरूच होता. जुने नाशिक भागात पूर्वीपासूनच दूषित पाणीपुरवठा होणे, कमी दाबाने पाणीपुरवठा त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. अशात खोदकामातील अनागोंदीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्याने जुने नाशिककरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे त्वरित फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती न करता तशाच फुटलेल्या अवस्थेत पाईप ठेवून कर्मचारी निघून गेल्याचे चित्र रात्री उशिरापर्यंत दिसून आले. पुन्हा पाणी वाया जाण्याची शक्यता आहे.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT