नाशिक

अपूर्व हिरेंसह पाच जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल

CD
अपूर्व हिरेंसह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ५ : येथील गांधी विद्यामंदिर संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २८ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार निवृत्त प्राध्यापक रमेश राघो पवार यांनी कॅम्प पोलिसात दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार संस्थेचे विश्‍वस्त व माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, लंकेश आनंदा मिस्तरी, राजेश शिंदे (सर्व रा. नाशिक), विश्‍वास सुकदेव पवार (रा. सौंदाणे) व दीपक देविदास सोनवणे (रा. सटाणा) या पाच जणांविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. निवृत्त प्राध्यापक रमेश पवार (रा. सोयगाव) यांनी मुलगा स्वप्नील पवार याला महात्मा गांधी विद्यामंदीर संस्थेत नोकरी मिळावी यासाठी संस्थेचे विश्‍वस्त अपूर्व हिरे यांची २०१६ मध्ये नाशिक येथील महात्मानगर भागातील कार्यालयात भेट घेतली. हिरे यांनी त्यांना सहा महिन्यात कनिष्ठ महाविद्यालयात नियुक्ती आदेश देण्याचे आश्‍वासन देण्यात आले. तसेच पैशांच्या व्यवहारासाठी लंकेश मिस्तरी यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. असे पवार यांनी तक्रारी म्हटले आहे. मिस्तरी यांनी शिक्षकाच्या नोकरीसाठी १५ लाखाची मागणी केली. सुरवातीला एक लाख रुपये दिल्यानंतर उर्वरित रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर आरटीजीएसद्वारे तसेच रोखीने घेण्यात आली. काही दिवसानंतर कनिष्ठ महाविद्यालयाऐवजी माध्यमिक विद्यालयात नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ऑक्टोबर २०१८ मध्ये शिक्षक मान्यतेसाठी ८ लाख रुपयाची मागणी करण्यात आली. सदर रक्कम संस्थेच्या नाशिक येथील दंत महाविद्यालय कार्यालय व परिसरात संबंधितांनी रोख स्वरूपात स्विकारली. शालार्थ आयडीसाठी २०२३ ते २०२५ या कालावधीत पुन्हा फोन पे व रोख स्वरूपात पाच लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलाला नोकरी न मिळाल्याने व दिलेले पैसे देखील परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. माझ्याविरुद्ध राजकीय आकसापोटी व हेतुपुरस्सर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या कथित पैशांच्या देवाण-घेवाणीशी माझा कोणताही संबंध नाही. या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि सत्य न्यायालयीन प्रक्रियेत निश्चितपणे समोर येईल. कायद्याच्या चौकटीत आम्ही या प्रकरणाला सामोरे जाऊ. नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर कोणीही विश्वास ठेवू. - डॉ. अपूर्व हिरे समन्वयक, गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT