Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : ‘सिव्हिल’चा लाचखोर कनिष्ठ लिपिक अटकेत; बिल मंजुरीसाठी स्वीकारले 5 हजार रुपये

Bribe Crime : लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता.७) सायंकाळी ६ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : वैद्यकीय बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता.७) सायंकाळी ६ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात अटक केली. अतीश छगन भोईर (वय ४५, रा. मानसी व्हिला बी, बनारसी नगर, हिरावाडी, पंचवटी) असे अटक केलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. (clerk of Civil hospital arrest due to Accepted 5 thousand rupees bribe)

भोईर याची जिल्हा रुग्णालयात वर्ग तीनचे कनिष्ठ लिपिक म्हणून नेमणूक आहे. ३५ वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीचे सिझेरिअन झालेले असून, औषधोपचाराचा वैद्यकीय खर्च ९२ हजार ३७९ रुपये झाला. या वैद्यकीय बिलाची फाइल तक्रारदाराने शुक्रवारी सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केली.

त्यावेळी भोईर याने वैद्यकीय बिलाची फाइल पुढील कार्यवाही करून लवकर आणून देण्यासाठी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या ६ टक्क्यांप्रमाणे साडेपाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली.

त्यानुसार शहानिशा करून पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून जिल्हा रुग्णालयातील दालनामध्ये सायंकाळी ६ वाजेदरम्यान ५ हजार रुपयांची लाच घेताना पथकाने भोईर यास अटक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT