Nitin Ware
Nitin Ware esakal
नाशिक

Nashik Kala Katta | कलाकारांचा कलेशी व वाचकांशी विचारसंवाद; कलात्मक तबला रुजविणारे नादसाधक : नितीन वारे

सकाळ वृत्तसेवा

"स्वतःचा साधनामार्ग समृद्ध आणि प्रशस्त होत असतानाच नव्या पिढीलाही त्या मार्गावरून चालता यावे यासाठी सतत धडपडणारे गुरू हेच खरे कलाप्रसारक असतात. नितीन वारे अशाच कलागुरूंपैकी एक. नाशिक नगरीत गेल्या सत्तर वर्षांपासून तबला वादनाचा प्रसार करणारे ज्येष्ठ गुरू पं. कमलाकर वारे यांचा वारसा जपणारे यशस्वी कलाकार आणि उत्तम गुरू म्हणून त्यांचा लौकिक आहे. पं. भानुदासबुवा पवार, पं. नाना मुळे, पं. बापू पटवर्धन, पं. नारायण जोशी अशा गुरुजनांच्या सहवासाने समृद्ध आणि परिपक्व झालेले त्यांचे विचार ‘सकाळ’ च्या वाचकांसाठी शेअर करताना ते म्हणतात, साधकाचा कलेकडे जाणारा प्रवास हा तंत्रापासूनच सुरू होतो."

- तृप्ती चावरे- तिजारे.

(Nashik Kala Katta Artists interactions with art and with readers Nadsadhak who inculcates artistic tabla Nitin Vare interview nashik news)

गुरूने शिकवलेली परंपरेची विद्या स्वतःला पूर्णपणे आत्मसात झाली असेल तरच तिचे तंत्रमंत्र गुरूने शिष्याला शिकविण्यात अर्थ आहे. योग्य तंत्र आणि शुद्ध विद्या देणे, ही एक जबाबदारी मानली तर परंपरा, नजाकत आणि त्यातली कला समोर उलगडून ठेवता येईल आणि अशा दर्जेदार प्रसारामुळे ती चिरकाल राहील.

पूर्वीच्या काळी कला शिक्षणासाठी एकच भाव शिष्याच्या ठायी असे, तो म्हणजे गुरूवरची श्रद्धा. आज मात्र ‘मल्टी चॉईस’ आणि परीक्षा या उथळ प्रलोभनांमुळे आधी गुरूलाच विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करावा लागतो.

श्रद्धा वगैरे नंतर, नितीनजींच्या ‘आदिताल अकादमीत’ मात्र हे चित्र जरा निराळे आहे. कारण कुतूहल, विचार आणि विज्ञान याबाबतीत पुढारलेल्या आजच्या पिढीवर तबल्याचे संस्कार रुजविताना नितीनजी तबल्याच्या प्रत्येक बोलाचा, आकृतीचा आणि संस्काराचा कार्यकारणभाव विद्यार्थ्याला समजावून सांगणे महत्त्वाचे मानतात.

तबला जलद लयीत गेल्यावरही त्यातील सहजता आणि स्पष्टता हे गुण कमी होऊ नयेत यासाठी मूळ लयीच्या साधनेतच ते हा कार्यकारणभाव सांगतात. विद्यार्थ्यांच्या मनात नकळतच कलेची आकृती तयार होत जाते, तबला ‘बडविणे’ आणि हात ‘घडविणे’ यातला फरक त्याला समजू लागतो.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कान, नजर, आणि बुद्धी घडविण्याचे माध्यम म्हणून नितीनजी विद्यार्थ्याच्या हाताकडे पाहतात, त्या हातातून केवळ तबल्याचे बोल न निघता तबल्याची ‘वाणी’ निघावीत यासाठी ते प्रयत्न करतात.

प्रगत विद्यार्थ्यांना ताल आणि ठेका यातील फरक शिकवितात. तबल्यातील प्रत्येक रचना ही श्रेष्ठ साहित्य प्रकारासारखी आहे, तिचे रसग्रहण समजावताना ते दोन मात्रांमधील श्वास जिवंत करायला शिकवितात.

आजकाल पालकांच्या स्पर्धात्मक महत्त्वाकांक्षेमुळे मुलांमधला संयम कमी झाला आहे हे सांगताना नितीनजी म्हणतात, साधना ही नजर कमावण्याची गोष्ट आहे, परंतु त्यातच मुलांचा ठहराव कमी झाला आहे.

कारण पालक त्यांना चंचल बनवतात. माझ्या मुलाला एकाच वेळी अनेक गोष्टी याव्यात, अशी चुकीची अपेक्षा पालकच करतात. अशाने मुलांची नजर एका साधनेवर एकाग्र कशी होणार? दरवर्षी नाशिकमध्ये शेकडो विद्यार्थी तबला विशारद होतात, त्यातले ऐंशी विद्यार्थी, पास झाल्यावर तबला सोडून देतात.

दहा, स्वतःचा क्लास काढतात, आठ पुढच्या परीक्षेची तयारी करतात आणि एखादा- दुसराच पुढे शिकण्याचे ध्येय ठेवतो, याची नितीनजींना खंत वाटते. ध्येयात दर्जा असावा. आज मिळणाऱ्या संधीपेक्षा परंपरेची विद्या मोठी वाटावी यासाठी विद्यार्थी आणि पालक हे कॉम्बिनेशनही दर्जेदार असावे लागते.

कारण नितीन वारेंसारखे, साऱ्या संवेदना एकवटून विद्यार्थी घडविणारे गुरू हे नाशिकचे दर्जेदार तबला वादनाचे आणि उत्तम साथ-संगतीचे भविष्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT