Dipak Karanjikar esakal
नाशिक

Nashik Kala Katta Part 2: समाज प्रबोधनाची कला गवसलेले विचारवंत : दीपक करंजीकर

सकाळ वृत्तसेवा

"भारतीय नागरिक म्हणून आपल्या अवतीभोवती अनेक जागतिक प्रश्न आहेत, परंतु या प्रश्नांचे आकलन त्यांनाच होत असते ज्यांना त्या प्रश्नांचे कंगोरे समाजहित आणि पर्यायाने देशहित दृष्टिकोनातून टिपता येतात. नाशिकचे विख्यात लेखक व अभिनेते दीपक करंजीकर असेच दूरदृष्टी कमावलेले व ती समाजाच्या दिशेने प्रवाही करणारे सुजाण विचारवंत. ते करीत असलेले समाज प्रबोधन ही कुतूहलातून निर्माण झालेली एक वेगळीच कला आहे म्हणून त्यांच्याशी हा संवाद..." - तृप्ती चावरे- तिजारे.

(Nashik Kala Katta Part 2 Intellectuals who mastered the art of social enlightenment Deepak Karanjikar nashik)

जगप्रवासाच्या अनुभवाच्या जोडीने आणि स्वतःच्या अभिनयातून गवसलेल्या निरीक्षण कौशल्यातून जागतिक घडामोडींच्या पडद्याकडे पाहताना ते म्हणतात, जगात किंवा आजूबाजूला घडणाऱ्या एखाद्या नवीन गोष्टीबद्दल कुतूहल जिवंत असणं ही गोष्ट अभिनेत्यासाठी जितकी महत्त्वाची आहे.

तितकीच ती विचारवंतासाठीही महत्त्वाची आहे. प्रत्येकासाठी अगदी स्वाभाविक असलं पाहिजे. मी अमेरिकेत असतानाच जगाला हादरवून टाकणारी ९/११ ची घटना घडली.

ही घटना घडण्यामागचं नेमकं कारण काय, ती सुनियोजित होती का, त्या घटनेआधी काहीतरी घडून गेलं आहे म्हणून ती घटना घडली का, अशा अनेक प्रश्नांच्या मुळाशी जाणाऱ्या चर्चांवर विचार आणि अभ्यास केला.

यातून जाग्या झालेल्या कुतूहलानेच जागतिक प्रश्नांकडे बघण्याची आणि त्यांची वास्तववादी उकल करण्याची एक वेगळी दृष्टी दिली. एखाद्या गोष्टीमागच्या गोष्टीचे नीट आकलन व्हावे, या कुतूहलापोटी जागतिक विषयांवरची ४८२ पुस्तकं वाचली तेव्हा कुठे मला प्रश्नांचे खरे ताणे-बाणे कळू लागले.

अभिनय क्षेत्रात दीपकजी ज्याप्रमाणे तरल आणि संवेदनशील कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे ते समाजातही जागरूक नागरिकत्वाचा पुरस्कार करणारे आग्रही विचारवंत म्हणूनदेखील परिचित आहेत.

आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये, किमान इतकी सामाजिक शिस्त पाळणे प्रत्येक नागरिकाचे आणि कलाकाराचेही कर्तव्य आहे असे ते आवर्जून सांगतात. मी कलाकार आहे म्हणून मोठ्याने स्पीकर लावून दुसऱ्याला त्रास देऊ शकत नाही.

सार्वजनिक आयुष्य परस्परावलंबी असते, त्यामुळे नागरिकांनी एकमेकांच्या जाणीवा संवेदनशीलपणे जपणे प्रत्येकालाच आवश्यक वाटले पाहिजे. कुणीतरी आपल्याला नियंत्रित केल्याशिवाय आपण स्वैराचार थांबवूच शकत नाही का, सामान्य नागरिक, गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, कलाकार, सेलिब्रेटी... कोणीही असो, प्रत्येकात समाज वर्तनाची स्वयंशिस्त हवी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आपण हक्कांसाठी जितके जागरूक असतो तितकेच कर्तव्यासाठीही जागरूक असणे यालाच दीपकजी सुजाण नागरिकत्व म्हणतात. ‘दुसऱ्याची जाणीव असणं’ हा कलाकार आणि सामान्य नागरिक या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखांना जोडणारा समान धागा असतो.

दोन्ही घटकांमधील भावना आणि भूमिका समजून घ्याव्या लागतात. कलाकाराला मिळणारा कॅनव्हास छोटा असतो, तर नागरिकत्वाचा मोठा. एक नागरिक म्हणून सामाजिक कर्तव्ये आणि एक कलाकार म्हणून प्रेक्षकांप्रती असलेले दायित्व या दोन्ही गोष्टी कलाकाराला समजल्या पाहिजेत, हेच कलाकारांचे नागरिकत्व असे दीपकजींना वाटते.

जीवनातील प्रत्येक क्षण, प्रत्येक घटना ही एक नवा आदर्श दाखवीत असते, त्यामुळे एखाद्या व्यक्ती आदर्शापेक्षाही त्यांना उत्तम आणि दर्जात्मक विचारांचे अनुसरण जास्त महत्त्वाचे वाटते.

जागतिक बाजारपेठेने भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या वर्चस्वातून अनेक देशांतील देशवासीयांच्या वैयक्तिक जीवनात केलेला हस्तक्षेप आज युद्धजन्य परिस्थिती ओढविण्या इतपत गंभीर होताना दिसत आहे.

गरजेपेक्षा भरमसाट उत्पादन करण्याची आणि ते साठविण्याची चढाओढ लागलेल्या आजच्या आधुनिक बाजारू जीवनात वैयक्तिक आणि सामाजिक सुखवस्तूपणाच्या कल्पना आणि जीवनशैली या दोन्ही गोष्टी झपाट्याने बदलत आहेत.

हा बदल थेट आपल्या सभ्यतेवर आणि संस्कृतीवर परिणाम करणारा आहे. दीपकजींचे विचार या परिणामावरच प्रश्नचिन्ह उभे करणारे आहेत. जागतिक सत्ताकेंद्र हे त्यागवादाकडे काणाडोळा कडून भोगवादाकडे का झुकते आहे, या प्रश्नाने एका सुजाण समाजाला अस्वस्थ करून सोडण्याची ताकद त्यांच्या विचारात आहे.

कलासक्त मनाचे वास्तववादी आणि प्रबोधक विचारवंत म्हणून दीपक करंजीकर नाशिकचे नाव जगाच्या पडद्यावर झळकावीत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT