Kalaram Mandir esakal
नाशिक

Nashik News : सौरऊर्जेच्या प्रकाशाने उजळले काळाराम मंदिर

Nashik News : काळाराम मंदिराच्या आवारात सौरऊर्जेचा वापर करीत वीजनिर्मिती करण्यात येत आहे. त्यासाठी मंदिराच्या ओवरीच्या वरील भागात सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : काळाराम मंदिराच्या आवारात सौरऊर्जेचा वापर करीत वीजनिर्मिती करण्यात येत आहे. त्यासाठी मंदिराच्या ओवरीच्या वरील भागात सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली आहे. स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या सीएसआरअंतर्गत साडेचौदा लाख रुपयांची ही यंत्रणा उभी केली आहे. सहा महिन्यापासून ही यंत्रणा कार्यान्वित होऊन मंदिराचे आवार सौरऊर्जेच्या प्रकाशाने झळकत आहे. काळाराम मंदिराच्या मंदिर, गर्भगृह, सभामंडप, ओवऱ्या, कळस, कार्यालय आदी ठिकाणी दिव्यांसह पंखे, ध्वनिव्यवस्था आदी विद्युत उपकरणे वापरात आहेत. ()

यापूर्वी मंदिरात तीन होते. महिन्याला साधारण दोन हजार युनिटपर्यंत वीज वापरली जात होती. त्याचे दर महिन्याला साधारणतः ६० ते ६२ हजार रुपयांचे बिल संस्थानला भरावे लागत होते. मंदिराला १२ किलोवॅटच्या विजेची गरज होती. भविष्यात विचार करता त्या दृष्टीने १५ मेघा किलोवॅटची सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा ऑन ग्रीड सिस्टिम आहे. त्यामुळे वापरात न आलेली ऊर्जा दुसऱ्या महिन्यात वापरता येईल, अशी योजना आहे. (latest marathi news)

या सौरऊर्जा यंत्रणेची वॉरंटी २५ वर्षांची आहे. ही सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी एसबीआयच्या नाशिक शाखेचे महाउपप्रबंधक राजीव सौरव व उपप्रबंधक यज्ञेश झंवर यांचे सहकार्य मिळाले आहे. मुंबई येथील पीव्ही पॉवर टेक्नानॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ही सौरऊर्जा यंत्रणा बसविली आहे. महावितरणचे उपअभियंता प्रदीप डालू यांच्याकडून तांत्रिक बाबींसाठी सहकार्य मिळाले आहे.

''काळाराम मंदिराचे व परिसरातील दिवे, कार्यालयीन कामकाज, याच सौरऊर्जेच्या निर्मित विजेवर चालते. पूर्वी ६२ हजार रुपये वीजबिल येत होते, सौरऊर्जेमुळे महिना चारशे ते पाचशे रुपये येत आहे. या प्रकल्पामुळे श्री काळाराम मंदिर संस्थानचे महिन्याला जवळपास ६१ हजार रुपये बचत होत आहे.''- शुभम मंत्री, विश्वस्त, श्री काळाराम मंदिर संस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT