Gyanada in the role of Lokmanya Tilak and Vaidehi in the role of Rani Lakshmibai became special attractions in Kalvan.
Gyanada in the role of Lokmanya Tilak and Vaidehi in the role of Rani Lakshmibai became special attractions in Kalvan. esakal
नाशिक

Nashik News : कळवण बनतेय चित्रपटनिर्मितीचे माहेरघर! यशस्वी चित्रपट निर्मितीनंतर नाट्यकर्मींचीही पसंती

रवींद्र पगार

कळवण : कळवणसारख्या आदिवासी भागातील मुबलक निसर्ग सौंदर्य आणि धरणे, ग्रामीण भागातील टुमदार घरे, रस्ते डोंगरदऱ्या, उपलब्ध कलाकार, बालकलाकार आणि एकूणच कळवणमध्ये चित्रपट निर्मितीसाठीच्या पोषक वातावरणामुळे ‘विराट जिंदगी’ या सिनेमा निर्मात्यांच्या रूपाने उजळलेल्या कळवणवर आता शहरी नाट्यकर्मींची कृपादृष्टी बरसली आहे. बालनाट्य कलाकारांच्या शोधात आलेले प्रवीणकुमार भारदे कळवणला आले आणि चांगलेच रमले. त्यांनी तब्बल आठवडाभर मुक्काम वाढवत स्थानिक बालकलाकारांना सोबत घेत नाट्यप्रयोग केले. (Nashik Kalvan becoming home of successful film production)

बहुतांश सिनेमाचे बाह्यचित्रीकरण म्हटले की ते महागड्या शहरात व परदेशात होत असते. मराठी सिनेमाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने हौशी निर्माते आर्थिक नियोजन बसविण्यासाठी ग्रामीण भागात चित्रीकरणाला पसंती देत आहेत. यातूनच मुंबईपासून जवळ असल्याने निर्माते नाशिक व ग्रामीण भागात येऊ लागले आहेत.

आता यात नाट्यकर्मींची भर पडत आहे. कौलारू घरे असलेली टुमदार गाव, धुक्याची दुलई आदींची भुरळ पडल्याने सप्तशृंगगड हिलस्टेशन असल्यामुळे चित्रपट, लघुचित्रपट तसेच मराठी गाण्यांच्या चित्रीकरणासाठी येथे कायम आकर्षण राहिले आहे. येथे व्हीडिओ अल्बमचे चित्रीकरण देखील होत आहे.

दशकभरापूर्वी तालुक्यातील कातळगावात भाऊ कदम, सौमित्र अर्थात किशोर कदम आणि ओम भूतकर ‘विराट जिंदगी’ या मराठी सिनेमाचे चित्रीकरण झाले होते. कोरोनामुळे सिनेसृष्टीवर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे थांबलेले अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर येत असताना रोजगाराच्या समस्या निर्माण होत्या. अशा काळात ‘मजनू’ सिनेमाने कळवण परिसरातील शंभराहून अधिक नवोदित कलाकार, आजूबाजूच्या व्यावसायिकांना थोडाफार रोजगार मिळवून दिला आहे. नवोदित कलाकरांना नामी संधी यामुळे मिळत असते.  (latest marathi news)

"‘हॅप्पी बर्थडे, जंगली बाणा आणि निंज्या-टॉम’ या बालनाट्यांत कळवण परिसरातील २९ बालकलाकरांना काम करण्याची संधी निर्मात्याने उपलब्ध करून दिल्याने कळवण तालुक्यातील अनेक युवक-युवतींना अभिनय शिकण्याची आवड निर्माण होत आहे. परंतु, सिनेमात दुरुस्तीच्या संधी असतात तशा नाटकात नसतात. असे असले तरीही कळवणकर प्रतिभावंत असल्याने त्यांना भविष्य चांगले असून, यापुढेही लवकरच नाट्यप्रशिक्षण कार्यशाळा आयोजनाचा मानस आहे."- प्रवीणकुमार भारदे, सिने-नाट्यनिर्माते, माता अनुसया संस्था

या ठिकाणांना प्राधान्य

‘विराट-जिंदगी’मध्ये कातळगाव व परिसर, मजनूमध्ये कळवणमधील शाळा-कॉलेजेस, नांदुरीचे विश्रामगृह, बिलपुरी, ब्रिटिशकालीन चणकापूर धरण, पुनद नदीवरील अर्जुन सागर धरण या स्थळांवर चित्रीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. स्वेतलाना अहिरे व रौंदळ चित्रपटाद्वारे नेहा सोनवणे या मूळच्या कळवण तालुक्यातील कलाकारांना रुपेरी पडद्यावर झळकता आले असून, नाट्यप्रयोगांमुळे बाल कलाकारांच्या चित्रपटात आणि नाटकांमध्ये काम करण्याची अपेक्षा वाढल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT