Tribal Ashram school  esakal
नाशिक

Tribal Ashram school : विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या अळ्या! खर्डेदिगर येथील शासकीय आश्रमशाळेतील प्रकार

Nashik News : आदिवासी मुले व मुलींच्या निवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार खर्डेदिगर येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये उघडकीस आला.

सकाळ वृत्तसेवा

कळवण : आदिवासी मुले व मुलींच्या निवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार खर्डेदिगर येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये उघडकीस आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Larvae found in students food in Government Ashram School)

याप्रकरणी जागृत पालकांनी तक्रार केली असून शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणापासून शिक्षणाच्या ज्ञानदान करणाऱ्या वर्गखोल्याशेजारील दुर्गंधी, पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्यांकडे तक्रार करत लक्ष वेधले आहे. याप्रकरणी आमदार नितीन पवार यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयासह आदिवासी विभागाला या प्रकरणी चौकशी करून कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत.

शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचा परिपूर्ण आहार देण्याचा कार्यक्रम शासकीय स्तरावर राबविला जात असताना कळवण तालुक्यात निकृष्ट आहार आदिवासी विद्यार्थ्यांना पुरवला जात असल्याबद्दल आमदार पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आदिवासी विकास विभाग प्रशासनाचे लक्ष वेधत तालुक्याच्या आदिवासी दुर्गम आणि अतिदुर्गम खर्डेदिगर भागात सर्वसुविधांयुक्त शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह इमारतीची माजी आदिवासी विकासमंत्री स्व. ए. टी. पवार यांनी उभारणी करून आदिवासी भागात शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह आणि शिक्षणाचे जाळे पसरवले. (latest marathi news)

मात्र शासकीय यंत्रणेकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण व अन्न, वस्र, निवारा व सुविधांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी आमदार पवार यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करीत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांतील विद्यार्थी सुविधांबाबत चौकशीच्या आदिवासी आयुक्त कार्यालयाला सूचना केल्या.

दुर्गंधीचाही विद्यार्थ्यांना त्रास

खर्डेदिगर शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवण निकृष्ट मिळत असून अन्नात अळ्या आढळल्या, शौचालयात पाणी नसल्याने बाहेर नैसर्गिक विधीसाठी जावे लागते, आश्रमशाळेला टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो, विद्यार्थ्यांच्या वर्गखोलीशेजारी शौचालय असल्यामुळे दुर्गंधीचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT