Karvand nets blooming in the hills of Ratanwadi in the tribal area of ​​Igatpuri taluk.
Karvand nets blooming in the hills of Ratanwadi in the tribal area of ​​Igatpuri taluk. esakal
नाशिक

Nashik News : डोंगरदऱ्यांत बहरताहेत करवंद! इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांना हक्काचा रोजगार

पोपट गवांदे

इगतपुरी शहर : तालुक्यातील डोंगर-दऱ्यातील ‘डोंगरची काळी मैना’ म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंद बहरू लागली आहेत. आता रानमेवाही तयार होऊ लागल्याने आगामी महिनाभरातच या भागात रानमेव्याचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांसाठी हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. (Nashik Karvand blooming in hills Rightful employment for tribals in Igatpuri taluka marathi news)

कसारा घाट, त्रिंगलवाडी, आवळखेड, धारगाव, भावली, बोर्ली, जांमुढे, गव्हाडे, खैरगाव या परिसरात आंबटगोड करवंदांच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगांचे करवंदांचे घड बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो. आदिवासी बांधव पहाटे लवकर करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करतात.

वसंत आणि ग्रीष्मातील दाहकतेमुळे पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका चविष्ट, आंबट, गोड, रसाळ, रानमेवा जिभेवर ठेवताच तासनतास त्या रानमेव्याच्या विशिष्ट चवीची आठवण उन्हाळ्यात होतेच होते. विलायती चिंच, आवळा, आंभळे, तोरणं, कैरी आदींची चवही काही न्यारीच आहे. करवंद हे बेरी वर्गीय फळ असून त्याचा आरोग्य राखण्यासाठीही उपयोग होतो. यामधील अनेक घटक रोगप्रतिकारशक्तीचे काम करतात.

करवंद हे नाशवंत फळ असल्याने जास्त काळ टिकत नाही, मात्र कच्च्या करवंदांचे लोणचे व पिकलेल्या करवंदांचा मुरब्बा केला तर जास्त काळ टिकतो. करवंदांच्या झाडांना प्रचंड प्रमाणात काटे असतात. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशा गर्मीत थंडगार करवंद खायला मस्त असून ती खाल्ल्यानंतर मनाला गारवा मिळतो. (latest marathi news)

आदिवासी भागातील करवंद मुंबई, पुणे, नगर, संगमनेर, शिर्डी, नाशिकपर्यंत पोचतात, मात्र हक्काची बाजारपेठ नसल्याने व्यापारी वाटेल त्या भावात करवंद खरेदी करून विक्री होतात. तर बालके व वृद्ध पळसाच्या पानाचे द्रोण भरून दिवसभर रस्त्याच्या कडेला बसून करवंदांची विक्री करतात. तर काही महिला इगतपुरी रेल्वे स्थानकावरही विक्री करताना दिसतात.

झाडांचे संवर्धन गरजेचे

आदिवासी भागातील कष्टपूर्वक काढलेल्या करवंदांना बाजारात कमी भाव मिळतो. शहरात व ग्रामीण भागात उन्हाळी रानमेव्याव्यतिरिक्त करवंदांची चव काही औरच असते, परंतु करवंद या रानमेवाच्या झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने याही झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

"करवंदांमुळे रोजगार उपलब्ध होत असल्याने इगतपुरीच्या अतिदुर्गम भागातील डोंगरदऱ्या परिसरात करवंदांची शेती करणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने सहकार्य करणे गरजेचे आहे. करवंद या झाडाचे संवर्धन होण्याबरोबर आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल."- लहानू भले, ग्रामस्थ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT