power cut
power cut esakal
नाशिक

Nashik News: सततच्या खंडित वीजपुरवठ्याने कसबे सुकेणेकर हैराण! बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

कसबे सुकेणे : कसबे सुकेणे व मौजे सुकेणे (ता. निफाड) येथे सध्या वीज कंपनीकडून नियोजित ‘थ्री फेज’च्या वेळेतही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गावात फारसा वीजपुरवठा खंडित होत नसला, तरी मळ्याच्या वस्तीवर सातत्याने वीजपुरवठा खंडित केला जातो.

त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Nashik Kasbe Sukene shocked by continuous interrupted power supply Terror of leopard creates fear in villagers marathi news)

सध्या कसबे सुकेणे व परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. परिसरात आतापर्यंत लहान बालिका व दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असताना, सायंकाळी व पहाटे वीज कंपनीकडून वीजपुरवठा खंडित केला जातो.

वास्तविक अगोदरच तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्रीचा थ्री फेज पुरवठा शेतीसाठी दिला जातो. सध्या शेतीत गहू व इतर पिकांची भरणी सुरू असून, शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. (Latest Marathi News)

त्यातही रात्री खंडित होणारा वीजपुरवठा बिबट्याला निमंत्रण देतो. परिणामी, शेतकरी आपल्या पाळीव प्राण्यांना बिबट्यांपासून वाचवायचे कसे, या चिंतेत आहेत. वीज कंपनीने सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

"सातत्याने रात्री खंडित होणारा वीजपुरवठा शेती व शेतकऱ्यांसाठी घातक ठरत असून, वारंवार होणारे बिबट्याचे हल्ले विचारात घेऊन वीज कंपनीने खंडित होणारा वीजपुरवठा रोखणे गरजेचे आहे." - विश्वासराव भंडारे, संचालक, विकास सोसायटी, कसबे सुकेणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT