Katharina Kolking while guiding the Human Resource Summit organized by AIMA. Other dignitaries on the platform next to it. esakal
नाशिक

Nashik News : उद्योग वाढीत मनुष्य विकास व्यवस्थापकांचे कार्य महत्त्वाचे : कथरीना कोलकिंग

Nashik News : गुणवत्ता येत असली तरी त्यांच्या मनोबलता वाढ करण्याची गरज असून, त्यादृष्टीने काम करण्यावर भर देण्याचे आवाहन इपिरोक कंपनीच्या वरिष्ठ महाव्यवस्थापक कथरीना कोलकिंग यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : उद्योगाच्या विकासासाठी महत्त्वाचा घटक असणारा कार्मिक व्यवस्थापक (एचआर) हा दूरदृष्टी ठेवणारा असतो. त्याच्या माध्यमातून उद्योग, उद्योजक व कामगार यांच्यात पूल बांधला जात असतो. बऱ्याच वेळा आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करण्याची भूमिका निर्माण करणे हे काम देखील एचआरचे असते. प्रत्यक्षात युवकांचा ‘स्कील’ तपासण्यासोबतच त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणे गरजेचे आहे. (Role of Human Development Managers in Industry Growth)

गुणवत्ता येत असली तरी त्यांच्या मनोबलता वाढ करण्याची गरज असून, त्यादृष्टीने काम करण्यावर भर देण्याचे आवाहन इपिरोक कंपनीच्या वरिष्ठ महाव्यवस्थापक कथरीना कोलकिंग यांनी केले. मनुष्यबळ विकास क्षेत्रातील व्यवस्थापकांसाठी ‘आयमा’ अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आयोजित ह्यूमन रिसोर्स समिटच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी समारोप प्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त शर्वरी पोटे, औद्योगिक सेप्टीच्या सहसंचालक अंजली आडे, आयमा अध्यक्ष ललित बुब, सरचिटणीस प्रमोद वाघ, एचआर समिटचे अध्यक्ष धीरज वडनेरे, हेमंत राक आदी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात समिटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी व्यासपीठावर भविष्य निर्वाह निधीचे विभागीय आयुक्त अनिल कुमार प्रीतम, राज्य कामगार विमा कॉर्पोरेशनचे उपसंचालक चंद्रकांत शेखर पाटील निपमचे अध्यक्ष प्रकाश बारी, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, माजी अध्यक्ष वरुण तलवार, जे. आर. वाघ, राजू अहिरे आदी उपस्थित होते. (latest marathi news)

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अनिल कुमार प्रीतम यांनी भविष्य निर्वाह निधीमध्ये नवनवीन संकल्पना राबविल्या जात असून येणाऱ्या योजनांची माहिती देत ५८ व्या वर्षी निवृत्त झाल्यावर लगेच पेन्शन सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात असल्याचे सांगितले.

आयमा अध्यक्ष ललित बूब यांनी आयमाच्या कार्याचा आढावा सादर केला. तसेच समिटच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. प्रास्ताविकात धिरज वडनेरे यांनी समिटच्या आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT