Primary health Center Award esakal
नाशिक

Nashik News: जिल्ह्यात 23 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार! मोहाडी प्रा. आरोग्य केंद्राला दोन लाखांचा पहिला पुरस्कार

Latest Nashik News : राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘कायाकल्प’ पुरस्कारासाठी जिल्ह्यातील २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५६ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांची निवड करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छतेसह आरोग्यदायी वातावरण निर्माण व्हावे व आरोग्याच्या चांगल्या सुविधा नागरिकांना मिळाव्यात, या उद्देशाने राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘कायाकल्प’ पुरस्कारासाठी जिल्ह्यातील २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५६ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांची निवड करण्यात आली आहे. (kayakalp Award to 23 Primary Health Centers in District)

जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचे दोन लाखांचे बक्षीस मोहाडी (ता. दिंडोरी) प्राथमिक आरोग्य केंद्राने, तर विल्होळी (ता. नाशिक) उपकेंद्राने एक लाखाचे बक्षीस पटकावले. २ ऑक्टोबर २०१४ पासून हे अभियान राबविण्यात येत आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या २२ आरोग्य केंद्रांना ५० हजार रुपये मिळणार आहेत. बेलगाव ढगा (ता. नाशिक) उपकेंद्राला द्वितीय क्रमाकांचे ५० हजार, तर तृतीय क्रमांकाचे ३५ हजारांचे बक्षीस वाजगाव (ता. देवळा) उपकेंद्राने मिळविले आहे.

उर्वरित ५३ आरोग्य उपकेंद्रांना २५ हजार मिळणार आहेत. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये वाडीवऱ्हे, काळुस्ते (इगतपुरी), जातेगाव, सय्यद पिंप्री, धोंडेगाव (नाशिक), उसवाड, वडनेरभैरव (चांदवड), तळेगाव (दिंडोरी), कनाशी, नवी बेज, तिऱ्हळ खु., ओतूर (कळवण), अंबोली चिंचओव्हल (त्र्यंबकेश्वर), चांदोरी, ओझर (निफाड), जायखेडा, ब्राह्मणगाव (बागलाण), पांढुर्ली, वावी (सिन्नर), खामखेडा (देवळा), आंबे (पेठ) या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात आली, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT