Kikwi Drinking Water Project esakal
नाशिक

Kikwi Drinking Water Project : किकवी पेयजल प्रकल्पाला मंजुरी! राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; नाशिकची तहान भागणार

Latest Nashik News : दोन महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिंडोरी येथील दौऱ्यात किकवी पेयजल प्रकल्पाला गती दिली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार ४ ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तब्बल १५ वर्षांनंतर किकवी पेयजल प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी (ता. ४) मंजुरी दिली आहे. ‘सकाळ’ने या प्रकल्पाची शहरासाठी असलेली गरज नुकतीच मांडली होती. (Kikwi Drinking Water Project Approved)

शहराची तहान भागविणारा एक हजार ४०० कोटींचा किकवी पेयजल प्रकल्प हा आता सुरू होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झालेली आहे. २००९ मध्ये नाशिक महापालिकेने हा प्रकल्प शहरासाठी प्रस्तावित केला होता. एकूण पाणीसाठा ७०.३६ त्यापैकी उपयुक्त ६० दशलक्ष घनफूट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. २०२१ मध्ये एक टीएमसी पाणी या प्रकल्पाद्वारे शहराला मिळणे अपेक्षित होते.

मात्र, तसे घडले नाही. गंगापूर धरणावरील अवलंबित्व कमी व्हावे, त्यावर अधिक ताण पडू नये, तसेच मराठवाड्याला अधिक पाणी मिळावे, या हेतूने किकवी पेयजल प्रकल्पाची योजना आखली गेली होती. नाशिक शहराची वाढ वेगाने होत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिकाधिक तीव्र होईल. यासाठीची पूर्वयोजना म्हणून हा प्रकल्प सुरू करण्याचे ठरविले होते.

मात्र, यासाठीची भूसंपादन, वन विभागाची परवानगी या अशा अनेक शासकीय बाबींमुळे हा प्रकल्प बारगळला होता. दोन महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिंडोरी येथील दौऱ्यात किकवी पेयजल प्रकल्पाला गती दिली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार ४ ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. आता अधिक गतीने प्रकल्प उभारणीसाठीच्या कामांना सुरुवात होईल. (latest marathi news)

८८० हेक्टरचे भूसंपादन

किकवी प्रकल्पासाठी एकूण ८८० हेक्टर भूसंपादन होणे आवश्यक आहे. त्यापैकी ७०७ हेक्टर सर्व दहा गावांचे सरळ खरेदी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. मे २०२४ मध्ये त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. सुधारित मान्यता प्रस्तावानुसार भूसंपादनासाठी ६६२ कोटी रुपये आवश्यक आहे. प्रकल्पासाठी १७२ हेक्टर वनजमीन आवश्यक आहे. वन विभागाची वन जमीन वळतीकरण क्षेत्र प्रस्तावास नव्याने तत्त्वतः मान्यता मिळण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.

प्रकल्पाचे फायदे

- नाशिक शहरातील पाणीटंचाई प्रश्न मिटेल

- शहराच्या मध्यातून वाहत असलेल्या गोदावरी नदीचे पूर नियंत्रण

- या प्रकल्पामुळे १.५० मेगावॉट वीजनिर्मिती शक्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore: भाजपला कमी लेखण्याची चूक विरोधकांना महागात: पालकमंत्री जयकुमार गोरे; जिल्हा परिषद, पंचायत समितीतील विजयाचे श्रेय जनतेला!

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी कर्ज उभारणीस मान्यता

H1B Visa Cancellation Bill : अमेरिकेत एच १ बी व्हिसा रद्द करण्यासाठी विधेयक सादर, भारतीयांवर होणार मोठा परिणाम

Pune Police combing operation : पुणे पोलिसांचे बुधवार पेठेत कॉम्बिंग ऑपरेशन! रात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत धडक कारवाई

T20 World Cup: टीम इंडियाला धक्का! अभिषेक शर्मा हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT