Mango Decoration in Temple Saptashrungi Devi  esakal
नाशिक

Saptashrungi Devi Fort : फळांचा राजाचा आदिमायेच्या मंदीरात दरवळतो सुगंध..

Nashik News : आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर वटसावित्री पौर्णिमा निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

दिगंबर पाटोळे, सकाळ वृत्तसेवा

वणी : आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर वटसावित्री पौर्णिमा निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महिला भाविकांनी वट पौर्णिमेचे व्रत करीत वडाच्या झाडाच्या पुजना बरोबरच आदिमायेचे मनोभावे दर्शन घेत आपल्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी साकडे घातले. (King of Fruit Mango Decoration Temple Saptashrungi Devi Fort)

सप्तशृंगी गडावर सकाळी धुक्याच्या चादरीने आच्छादलेल्या अल्हाददायी अशा रम्यवातावरणात वट पौर्णिमा निमित्त सकाळी ट्रस्टच्या कार्यालयातून भगवतीच्या सुवर्ण अलंकाराची मिरवणूक काढण्यात आली होती. सकाळी पंचामृत महापूजा दरम्यान श्री भगवतीस हिरव्यागार रंगाचा महावस्त्र नेसवून सोन्याचे अलंकार घालून साजशृंगार करण्यात आला होता.

वट पौर्णिमे निमित्त मंदीरातील प्रवेशद्वारास फळांचा राजा असलेल्या आंब्याची पाने - डहाळीसह असलेल्या पिवळा, केशरी, लालसर आंबे तसेच हिरव्यागार कैऱ्यांची तसेच मंदीर गाभाऱ्यात विविध रंगी वेगवेगळ्या प्रकारच्या फुले व पानांची आकर्षक तोरण व झुंबर अशी मनमोहक आरास नाशिक येथील भाविक शंकर जुन्नरे यांच्यावतीने करण्यात आली होती. (latest marathi news)

भाविक मंदीरात पोहचताच आदिमायेचे तेजस्वी आश्वाषक रुप व हिरव्यागार पानाची शितलता व आंबाच्या दरवळणारा घमघमाट अशी विलोभनिय अनुभूती घेवून आदिमाये चरणी नतमस्तक होत भाविक मंदीरातून बाहेर पडत होती.

वट पौर्णिमा निमित्त महिला वर्गाने वडाची पूजन झाल्यानंतर देवी दर्शनासाठी दुपारनंतर मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT