Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : महावितरणाचा अभियंता ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात! पिंपळगाव बसवंत येथील घटना

Nashik News : पिंपळगावच्या महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता किसन भीमराव कोपनार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव : व्यावसायिक इलेक्ट्रीक मीटर ऐवजी औद्योगिक इलेक्ट्रीक मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात व्यावसायिकाकडून एक लाख रुपयांची लाच घेताना पिंपळगावच्या महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता किसन भीमराव कोपनार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.( Deputy Executive Engineer of Pimpalgaon Mahavitaran was caught red handed)

वर्षभरापूर्वी पिंपळगाव महावितरण विभागाच्या उपकार्यकारी अभियंतापदी किसन कोपनार यांची बदली झाली होती. त्यांच्या कार्यपद्धती येथील नागरिकांची सतत ओरड होती.

यातच शहरातील एका दुकानादारकडे असलेले व्यावसायिक इलेक्ट्रिक मीटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता काढून घेत त्याठिकाणी औद्यागिक इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात एक लाख रूपयांची लाच कोपनार यांनी तक्रारदार याच्याकडे मागितली. (latest marathi news)

याप्रकरणी व्यावसायिक याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शुक्रवारी (ता.५) दुपारी लाचेची रक्कम घेताना उपकार्यककारी अभियंता कोपनार यांस लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगहाथे पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्वारीच्या कोठारात यंदा हरभरा-करडईची पेरणी! अतिवृष्टीमुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ५७० कोटींचा फटका; ऑक्टोबर उजाडला तरी नाही 'मालदंडी'ची पेरणी

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला जाताय? तर चुकूनही विसरू नका 'या' 2 गोष्टी, नाहीतर स्वतःचं नुकसान करून घ्याल..!

आजचे राशिभविष्य - 07 ऑक्टोबर 2025

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT