नाशिक

ध्वजारोहण सोहळा पुरवणी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद लेख

CD
ध्वजारोहण सोहळा पुरवणी ----------------------------- केवळ सोहळा नाही, तर शाश्वत विकासाची पायाभरणी लीड ‘षष्ठि वर्ष सहस्त्राणि भागीरथ्यवगाहनम्‌; सकृत्गोदावरी स्नानं सिंहस्थेच बृहस्पतौ!’ या अमर श्लोकाच्या साक्षीने, दक्षिणवाहिनी गंगा मानल्या जाणाऱ्या पावन गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भूमीत सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा प्रारंभ ध्वजारोहणाने होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची पर्वणी केवळ एक धार्मिक सोहळा नसून नाशिकच्या सर्वांगीण विकासाची सुवर्णसंधी आहे. यंदा केंद्र व राज्य सरकारच्या ‘अमृतकुंभ’ योजनेंतर्गत सिंहस्थासाठी ३५ हजार कोटींचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा उपयोग केवळ तात्कालिक व्यवस्थेसाठी न करता नाशिकच्या दीर्घकालीन, शाश्वत आणि पायाभूत विकासाचे एक मजबूत नियोजन करण्यासाठी केला जात आहे. -आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणारे साधु-महंत, तसेच देश-विदेशातून येणारे भाविक आणि पर्यटकांना अधिक चांगल्या, सुलभ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करणे हे प्रशासनाचे प्राथमिक ध्येय आहे. सिंहस्थ अमृतकुंभाच्या माध्यमातून नाशिकमध्ये दीर्घकालीन पायाभूत सुविधांची निर्मिती तर होत आहेच, शिवाय येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक समृद्ध अनुभव मिळावा यासाठी सर्व शासकीय यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहेत. ३५ हजार कोटींच्या निधीतून भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधांची निर्मिती केली जात आहे. यानिमित्ताने नाशिक शहर व संपूर्ण जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रमुख महामार्गांचे रुंदीकरण, चौपदरीकरण आणि बळकटीकरण वेगाने पूर्ण केले जात आहे. यासोबत रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील रेल्वेचे जाळे अधिक विस्तृत केले जात आहे. केवळ नाशिक रोड स्थानकच नव्हे, तर देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकणे या आसपासच्या स्थानकांचाही कायापालट करण्यात येत आहे. यामुळे सिंहस्थ काळात देशाच्या कान्याकोपऱ्यातून येणाऱ्या शेकडो विशेष रेल्वेगाड्यांचे संचालन आणि गर्दीचे नियोजन अत्यंत सहजतेने करणे शक्य होणार आहे. याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरिक्त धावपट्टी उभारणीसह विस्तारित अत्याधुनिक टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही सर्व पायाभूत कामे पूर्ण होताच नाशिकच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला खऱ्या अर्थाने नवे पंख मिळणार आहेत. --- पर्यटनक्षेत्राला बूस्ट पर्यटनाच्या दृष्टिकोनातून किल्ले जिल्ह्याची प्रमुख बलस्थाने आहेत. अलीकडच्या काळात नाशिक जिल्ह्याने विशाल धरण क्षेत्रे, विलोभनीय धबधबे, निसर्ग पर्यटन आणि कृषी पर्यटनाच्या क्षेत्रातही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाशिकचे आल्हाददायक वातावरण लक्षात घेता येथे ‘हेल्थ’ आणि ‘वाइन टुरिझम’लादेखील अथांग वाव आहे. सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिकची ही संपूर्ण पर्यटन क्षमता वेगळ्या आणि प्रभावी पद्धतीने संपूर्ण जगासमोर मांडण्याची सुवर्णसंधी जिल्ह्याला लाभली आहे. या संधीचे पूर्ण सोने करण्यासाठी प्रशासनाला सर्व नाशिककरांच्या सक्रिय सहकार्याची सार्थ अपेक्षा आहे. --- रिंग रोड ठरणार गेमचेंजर नाशिक शहराभोवती ६५ किलोमीटर लांबीचा एक भव्य परिक्रमा मार्ग म्हणजे बाह्य रिंग रोड उभारण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहराचा भौगोलिक विस्तार मोठ्या प्रमाणात होणार आहे. या नव्या रिंग रोडच्या दोन्ही बाजूंना दीड ते दोन किलोमीटरच्या परिसरात नवीन निवासी वसाहती, नवे उद्योग, व्यवसाय आणि विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प साकारले जातील. या माध्यमातून शहराच्या आणि पर्यायाने संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळेल. तसेच यातून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याने हा परिक्रमा मार्ग नाशिकच्या भवितव्यासाठी खरा ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. --- ब्रँडिंगची अद्वितीय संधी सिंहस्थ कुंभमेळा नाशिकच्या जागतिक ब्रँडिंगसाठी एक सुवर्णसंधी आहे. या संधीचा लाभ उठविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहेत. ‘सुरक्षित, स्वच्छ आणि सुनियोजित कुंभ’ ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाचे काम सुरू आहे. भाविकांच्या गरजांचा प्राधान्याने विचार करूनच सर्व पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. सिंहस्थामध्ये येणारा भाविक केवळ अमृतस्नान करून तातडीने माघारी जाऊ नये, तर त्याने नाशिकच्या भूमीत काही काळ व्यतीत करावा, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील इतरही धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांच्या विकासावर विशेष भर दिला जात आहे, जेणेकरून आलेला भाविक किमान तीन ते चार दिवस नाशिकमध्ये मुक्कामी राहील. या मुक्कामामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होतानाच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. --- डिजिटल कुंभमेळा राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने यंदाच्या कुंभमेळ्याला आधुनिक तंत्रज्ञानाची भक्कम जोड दिली आहे. गर्दीचे अचूक व सुरक्षित नियोजन करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि प्रगत कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. प्रमुख अमृतस्नान पर्वणीच्या काळात विविध सुरक्षायंत्रणा आणि शासकीय विभागांमध्ये अखंड संवाद व संपर्कासाठी अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान वापरले जात आहे. प्रशासकीय नियोजनात तंत्रज्ञानाचा असा व्यापक वापर केला जात असल्याने, खऱ्या अर्थाने यंदाचा कुंभमेळा हा एक अत्यंत सुसज्ज असा ‘डिजिटल कुंभमेळा’ म्हणून ओळखला जाईल. --- नाशिककरांचा स्वतःचा कुंभ सिंहस्थ कुंभमेळा हा जितका साधु-महंत आणि देश-विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांचा आहे, तितकेच महत्त्व या सोहळ्यात प्रत्येक नाशिककरांचेदेखील आहे. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने संपूर्ण नाशिकवासीयांचा स्वतःचा कुंभमेळा आहे. शासनाच्या थेट मार्गदर्शनाखाली सिंहस्थ प्राधिकरण, महसूल विभाग, महापालिका, पोलिस दल तसेच इतर सर्व संबंधित यंत्रणा या आयोजनात सक्रियपणे उतरल्या आहेत. मात्र, हा कुंभमेळा अत्यंत स्वच्छ, सुनियोजित आणि सुरक्षितरीत्या पार पाडण्यासाठी नाशिकच्या नागरिक बंधू-भगिनींनी स्वतःहून पुढे येत शासन व प्रशासनाचे हात बळकट करावेत, असे आपुलकीचे आवाहन करण्यात येत आहे. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

SCROLL FOR NEXT