नाशिक

ध्वजारोहण, गोदाआरतीला पोलिसांचा अतिरेक

CD
पास असूनही हुज्जत; नागरिकांशी अरेरावी ध्वजारोहण, गोदाआरतीला पोलिसांचा सुरक्षेच्या नावाखाली अतिरेक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.३१ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण आणि गोदाआरती सोहळ्याला पोलिसांच्या अवाजवी सुरक्षेचा मोठा फटका नागरिकांना बसला. ‘तगडा बंदोबस्त’ ठेवण्याच्या नावाखाली पोलिसांनी राबविलेल्या कडक धोरणामुळे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. अधिकृत व्हीआयपी आणि प्रवेश पास असूनही पोलिसांनी नागरिकांशी हुज्जत घालत त्यांना रोखून धरल्याने आणि ठिकठिकाणी केलेल्या बेछूट बॅरिकेटींगमुळे सर्वसामान्यांची प्रचंड कोंडी झाली. ध्वजारोहण व गोदाआरतीचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी शहराच्या विविध भागांतून नागरिक गोदाघाटावर आणि सोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांकडून झालेल्या अरेरावीमुळे नागरिकांचा उत्साह मावळला. ज्यांच्याकडे प्रशासनाने दिलेले वैध पास होते, त्यांनाही सुरक्षेचे कारण पुढे करत आत सोडण्यास नकार देण्यात आला. ‘पास दाखवूनही पोलिस ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते, उलट हुज्जत घालत होते, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. १६-१ अरुंद रस्ते बंद, पादचाऱ्यांची पायपीट गोदाघाटाकडे जाणारे आणि जुन्या नाशिकमधील अरुंद रस्ते पोलिसांनी बॅरिकेटींग लावून पूर्णपणे बंद केले होते. वाहनांना बंदी असतानाच पादचाऱ्यांनाही ये-जा करण्यासाठी रस्ता उरला नाही. लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना ऐन उन्हात किंवा गर्दीत दीड-दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली. १६-१ बॅरिकेटींग हटविण्याचा विसर मुख्य सोहळा पार पडल्यानंतर आणि प्रमुख पाहुणे निघून गेल्यानंतरही पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स काढण्याचे सौजन्य पोलिस यंत्रणेने दाखवले नाही. सोहळा आटोपल्यानंतरही रस्ते बंदच राहिल्याने या परिसरात प्रचंड कोंडी झाली. बंदोबस्त नियोजनासाठी असतो की नागरिकांना त्रास देण्यासाठी? असा सवाल संतप्त नाशिककरांनी उपस्थित केला आहे. अत्यंत अवाजवी बंदोबस्तामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. १६-१ रस्त्यावर एकच गर्दी राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा मार्गस्थ झाल्यानंतर, गोदाघाटावरून बाहेर पडणाऱ्यांची एकच गर्दी मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, मेनरोडसह परिसरातील रस्त्यांवर झाली. तर जागोजागी करण्यात आलेले बॅरिकेटींग अडथळा ठरत असल्याने गर्दीच्या कोंडीत आणखी भर पडली. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Who Is Nidhi Razdan : उमर अब्दुल्लांशी लग्न करणाऱ्या निधी राजदान कोण? त्यांची संपत्ती किती?

Nilanga News : 'पीएम श्रीच्या' शाळेचे बांधकाम अर्धवट सोडून ठेकेदार 'पळाला'; दोन वर्षापासून काम रखडले, विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शाळा भाड्याच्या घरात

Sugarcane Farmers Protest Escalation : ऊस दरावरून पश्चिम महाराष्ट्र पेटला! कारखान्यांच्या दारात उभारणार छावण्या; 'या' दिवशी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा मोठा इशारा

Maharashtra Mega Recruitment : तरुणांसाठी मोठी लॉटरी! महसूल विभागात हजारो पदांवर होणार थेट भरती; पाहा दरमहा किती मिळणार मानधन?

SCROLL FOR NEXT