नाशिक

डांबराच्या किमती दुप्पट, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर परिणामाची शक्यता

CD
मेन फोटो : H35154 नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले रस्त्याचे काम. ------------- डांबराचे दर दुप्पट; रस्ते कामांचा वेग मंदावला कुंभमेळ्याच्या कामावर परिणामाची शक्यता; मुदत गाठण्याचे आव्हान सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगाने बदलत्या घडामोडींमुळे ‘बीटूमिन’ (डांबर) च्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने त्याचा परिणाम सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरु असलेल्या रस्ते कामांवर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. निविदा प्रक्रियेत मंजूर केलेले दर व सद्यःस्थितीत बाजारभावातील दरात जवळपास दुप्पट झाल्याने फरक भरून काढण्यासाठी कंत्राटदार एकवटले असून, मंजूर स्टार रेटनुसार दर देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहणाने झाला आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिकसह राज्यातील अन्य धार्मिक ठिकाणांवर जवळपास ३४ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. यातील जवळपास ९५ टक्के कामे नाशिक- त्र्यंबकेश्‍वरसह ग्रामिण भागात सुरु आहेत. नाशिक शहरात २८ हून अधिक नवीन रस्ता व रस्ता रुंदीकरणाची कामे सुरु आहेत. यातील ७० टक्के कामे डांबरीकरणाशी संबंधित आहेत. यातील चाळीस टक्के कामांना स्टार रेट मंजूर आहे, तर ३० टक्के कामांना स्टार रेट मंजूर नाही. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने सरसकट स्टार रेट मंजूर करताना अंदाजपत्रकात नगरसेवकांना मंजूर करण्यात आलेल्या नगरसेवक निधीतून करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नगरसेवकांच्या विरोधामुळे सदरचा निर्णय मागे घेण्यात आला. रस्त्यांची कामे सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून शासन निधीतून होत असल्याने कार्यारंभ आदेश देतानाचा साहित्याचा दर व चालु स्थितीतील दराच्या फरकाची रक्कम शासन निधीतून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शासनानेदेखील फरकाची रक्कम देण्याचे मान्य केले होते. परंतु सद्यःस्थितीत याबाबत स्पष्टता नसल्याने ‘बीटूमिन’ च्या वाढत्या किमती रस्ते कामांना अडथळा ठरतं आहे. मार्च २०२७ अखेर रस्ते कामांची मुदत आहे. बीटूमिनच्या वाढत्या किमतीमुळे कामांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे वेळे आधी कामे पूर्ण होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. -------------------चौकट वाढत्या किमतीचा अडथळा सहा महिन्यांपूर्वी बीटूमिनची किंमत ४५-५० हजार रुपये मेट्रीक टन होती. आता जवळपास ८५ हजार रुपये मेट्रिक टनापर्यंत दर पोहोचल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्टार रेटनुसार वाढत्या किमतीचा फरक देण्यासाठी फरकाची रक्कम अदा करण्यासाठी निधी तरतूद करण्यात आली होती. परंतु राष्ट्रपती दौऱ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्‍वर येथे हेलिपॅड व पायाभूत सुविधांविषयक कामांसाठी निधी खर्च झाल्याने कंत्राटदारांची देयके देण्यासंदर्भात अडचण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. ------------कोट------- बीटूमिनच्या वाढीव दरांबाबत तेल कंपन्यांशी दोन ते तीन वेळेत बैठका झाल्या असून , कंपन्यांनी उपलब्धतेबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. लवकरच यातून तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा वाढीव दरांबाबत सरकारशी संपर्क साधण्यात येईल. सरकारच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. -शेखर सिंह, आयुक्त, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण. ---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL मधील निवृत्तीनंतर शेअर बाजारात एन्ट्री; धोनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा लवकरच येणार IPO

Cabinet Decision: शिक्षण क्षेत्रापासून न्यायालयापर्यंत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ धडाकेबाज निर्णय

Gurnoor Brar: भारताच्या गुरनूर ब्रारला ICC कडून मोठी शिक्षा! वनडेतील भांडण पडलं महागात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

SCROLL FOR NEXT