नाशिक

साधू-संतांच्या सुविधांसाठी २३६ अर्ज

CD
एन्कर -------------- साधू-संतांच्या सुविधांसाठी २३६ अर्ज महापालिकेकडे छाननीचा चेंडू; कुंभमेळ्याच्या नियोजनाला गती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २८ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील साधू-संत, महंत, आखाडे, आश्रम, मंदिरे आणि धार्मिक संस्थांना कायमस्वरूपी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाकडे २३६ अर्ज दाखल झाले आहेत. प्राधिकरणाने या अर्जांची छाननी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आता महापालिकेवर सोपवली आहे. सिंहस्थासाठी भाविक आणि साधू- महंतांना सुविधा देण्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. साधूग्राममध्ये महत्त्वाच्या धार्मिक संस्था आणि आखाड्यांना कायमस्वरूपी सुविधा देण्यासाठी निधीचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी प्राधिकरणाने इच्छुक संस्थांकडून ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज मागवले होते. प्राधिकरणाकडे आलेल्या २३६ अर्जांमध्ये महापालिका हद्दीतील आणि त्र्यंबकेश्वरमधील संस्थांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश संस्थांनी ऑनलाइन नोंदणी केली असली तरी काहींनी ऑफलाइन अर्ज सादर केले आहेत. ऑफलाइन अर्जांची ऑनलाइन नोंदणी करताना तांत्रिक अडचणी आल्याने काही अर्ज पोर्टलवर दिसत नसल्याने अशा सर्व अर्जांची प्रत्यक्ष तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्राधिकरणाने महापालिकेला दिल्या आहेत.प्राधिकरणाचे पत्र महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर लेखा व वित्त विभागाने हे सर्व अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहेत. छाननी करून पात्र संस्थांना निधी आणि सुविधा मंजूर करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याने कुंभमेळ्याच्या नियोजनाला गती मिळणार आहे. --------------चौकट अर्जांची विभागणी अशी नाशिक शहर हद्दीतून ८६ अर्ज ऑनलाइन तर ३ ऑफलाईन, नाशिक शहराबाहेर मात्र जिल्ह्यातील भागांतून ११४ ऑनलाइन आणि ८ ऑफलाईन, तर नाशिक जिल्ह्याबाहेरील भागांतून २४ ऑनलाइन आणि १ ऑफलाइन अर्ज प्राप्त झाला आहे. एकूण २२४ ऑनलाइन आणि १२ ऑफलाइन असे २३६ अर्ज प्राधिकरणाकडे जमा झाले आहेत. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : महाराष्ट्र फोडायला दोन हजार कोटी कुठून आले? कर्जतच्या सभेतून राज ठाकरेंचा गंभीर आरोप

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT