नाशिक

नदी स्वच्छता ही नागरिकांची जीवनशैली बनावी

CD
पान-२ मेन आहे --------------- NSK26H34178 नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ,राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कुंभमेळामंत्री गिरीष महाजन, जगतगुरु वल्लभाचार्य वल्लभराय, नरेंद्राचार्य महाराज, जगतगुरु माधवाचार्य महाराज आदी. -- NSK26H34179 नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संकेतस्थळाचे अनावरण करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कुंभमेळामंत्री गिरीष महाजन, जगतगुरु वल्लभाचार्य वल्लभराय, नरेंद्राचार्य महाराज, जगतगुरु माधवाचार्य महाराज आदी. -- H34171, H34172 नाशिक : गोदावरी महाआरतीवेळी उपस्थित असलेले मंत्री व लोकप्रतिनिधी. ------------ H34182 नाशिक : गोदावरी नदीकाठी झालेल्या महाआरतीवेळी पूजन करताना राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू. -------------------- नदी स्वच्छता ही नागरिकांची जीवनशैली बनावी --------------- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू : गोदावरी महाआरतीप्रसंगी अपेक्षा, महाआरतीची विश्‍वविक्रमाला गवसणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.३१ : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. या काळात परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि गोदावरी नदीचे प्रदूषण रोखणे आवश्यक आहे. धार्मिक उत्सवांचे पावित्र्य जपताना स्वच्छतेलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही. ती प्रत्येक नागरिकाची जीवनशैली बनली पाहिजे. सिंहस्थ कुंभमेळा हा स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि जलसंवर्धनाच्या दृष्टीनेही देशासमोर एक आदर्श निर्माण करणारा ठरावा, अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. ---------------- सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणानिमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, गंगा गोदावरी पंचकोनी पुरोहित संघ आणि कुंभमेळा प्राधिकरण यांच्यातर्फे आयोजित गोदावरी महाआरतीप्रसंगी राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, जगदगुरू वल्लभाचार्य वल्लभराय, माधवाचार्य महाराज, नरेंद्राचार्य महाराज यांसह तेरा आखाड्यांचे प्रमुख महंत, साधू, मंत्री, आमदार, नगरसेवक यांची उपस्थिती होती. राष्ट्रपती पुढे म्हणाल्या,‘आज बृहस्पतीचा सिंह राशीत प्रवेश झाल्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या मंगल पर्वाला प्रारंभ होत आहे. ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर भारताच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडवणारी अद्भुत परंपरा आहे. यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाची वेबसाइट तसेच टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. --------------- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या... - सिंहस्थ कुंभमेळा ही जीवनमूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची संधी - महाराष्ट्राने अनेक क्रांतिकारक दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब पोतनीस - लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल सदैव प्रेरणादायी - शेतीला शाश्वत आधार देणे ही शासनाची जबाबदारी ----------- ---२०-२ निसर्गाचा सन्मान करा : मनोगताचे सूत्र पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त समाज आणि नदीस्वच्छता या विषयावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांनी आपल्या मनोगतात भर दिला. नदीच्या काठावर वस्ती होते. पिण्यासाठी आणि इतर कामासाठी या पाण्याचा उपयोग केला जातो म्हणून या वाहत्या नदीचा आपण सन्मान केला पाहीजे. स्वच्छता आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले पाहिजे तसेच प्लॅस्टिकबाबत आपण सजग असले पाहीजे, असे सूत्र राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या मनोगतातून स्पष्ट झाले. --- ६,२३३ आदिवासी बांधवांच्या गोदाआरतीचा विश्वविक्रम! रामतीर्थावर आदिवासी बांधवांच्या सामूहिक गोदाआरतीचा विश्वविक्रम साकारला. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी हृषिकेष नाग यांनी ही घोषणा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो आदिवासी बांधवांनी एकाच वेळी दीप प्रज्वलित करून गोदामाईची आराधना केली. महाआरतीत नाशिक जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ६५० गाव-पाड्यांतील तसेच शहरातील २८ वस्त्यांतील आदिवासी बांधवांचा सहभाग होता. या उपक्रमासाठी ६ हजार २३३ जणांनी नोंदणी केली होती. प्रत्येक गावातून सहा पुरुष आणि चार महिला अशा दहा जणांचा सहभाग निश्चित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यांना तीन महिन्यांपासून आरतीचे प्रशिक्षण देण्यात आले. आरतीसाठी अध्यक्ष जयंत गायधनी, महंत नृसिंह कृपादास प्रभू यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Who Is Nidhi Razdan : उमर अब्दुल्लांशी लग्न करणाऱ्या निधी राजदान कोण? त्यांची संपत्ती किती?

Nilanga News : 'पीएम श्रीच्या' शाळेचे बांधकाम अर्धवट सोडून ठेकेदार 'पळाला'; दोन वर्षापासून काम रखडले, विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शाळा भाड्याच्या घरात

Sugarcane Farmers Protest Escalation : ऊस दरावरून पश्चिम महाराष्ट्र पेटला! कारखान्यांच्या दारात उभारणार छावण्या; 'या' दिवशी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा मोठा इशारा

Maharashtra Mega Recruitment : तरुणांसाठी मोठी लॉटरी! महसूल विभागात हजारो पदांवर होणार थेट भरती; पाहा दरमहा किती मिळणार मानधन?

SCROLL FOR NEXT