नाशिक

ध्वजारोहण सोहळ्यात खा. वाजेंचा अवमान

CD
पान-३ NSK26H34277 नाशिक : कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर महाआरतीवेळी खासदार राजाभाऊ वाजेंना मान न दिल्याने कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी चर्चा करत असलेले पक्षाचे गटनेते केशव पोरजे व नगरसेवक, पदाधिकारी. --------------- ३६-३ वाजेंच्या अवमानप्रश्नी शिवसेना आक्रमक प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन, आयुक्तांची दिलगिरी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे यांना दुय्यम वागणूक दिल्याच्या आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. याच्या निषेधार्थ पक्षाने आक्रमक भूमिका घेत सोमवारी (ता.२) सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. आयुक्त शेखर सिंह प्रोटोकॉलनुसार नियोजन केल्याचे सांगत संभ्रम निर्माण झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात खासदार वाजे यांचा अवमान झाल्याचे सांगत उबाठा पक्ष आक्रमक झाला आहे. उबाठाने याबाबत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेेवर धरत जाब विचारला. सोहळ्यात भाजपचे आमदार पहिल्या रांगेत तर नाशिकच्या खासदारांना चौथ्या रांगेत स्थान दिल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला. खासदार वाजेंना सिंहस्थाच्या बैठकांपासून दूर ठेवले जात असल्याचे सांगत सिंहस्थ नाशिककरांचा आहे की एका पक्षाचा, असा रोखठोक प्रश्‍न उबाठाने उपस्थित केला. विरोधी पक्षाच्या प्रभागांमध्ये सजावट किंवा भगवे झेंडे लावले नाही, असा जाब विचारताना प्रशासनाने या सोहळ्यात नगरसेवकांची चेष्टा केल्याचा आरोप उबाठातर्फे करण्यात आला. आंदोलनात उबाठाचे गटनेते केशव पोरजे, युवराज आव्हाड, योगेश भोर, विशाल पवार यांच्यासह इतर शिवसैनिक सहभागी झाले. --- १६-१ अवमानाचा हेतू नव्हता : सिंह सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात प्रोटोकॉलनुसार व्यासपीठावर आसनव्यवस्था करण्यात आली होती. ऐनवेळी आसन व्यवस्थेत मागे-पुढे झाल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली. परंतु, कुणाही लोकप्रतिनिधीचा अवमानाचा हेतू नव्हता. यासंदर्भात खासदार वाजे यांच्याशी चर्चा करुन त्यांना स्पष्टता देण्यात आल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. प्रोटोकॉलनुसारच मांडणी केली असल्याचे सांगत यापुढेही त्यानुसार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राजकीय संघर्ष नव्या वळणावर; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; ‘हिम्मत असेल तर...!’

Nanded Crime News: जागेच्या वादातून टेम्पो अंगावर घातल्याचा आरोप; अरुण कुंटे यांच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

Latest Marathi News Live Update : पुण्यात चक्रीवादळाचा प्रभाव! पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, तापमानात थेट ८ अंशांची घट; 'यलो अलर्ट' जाहीर

NCP leaders meet Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय? वरिष्ठ नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर पक्षाचं स्पष्टीकरण; भेट नेमकी कशासाठी?

Dharashiv News: भूममध्ये पाइपलाइनच्या कामादरम्यान पोकलेन अंगावर; मजुराचा मृत्यू, मदतीसाठी ग्रामस्थ आक्रमक

SCROLL FOR NEXT