labour Migration esakal
नाशिक

Kamgar Din : अचानक हृदयविकाराने मृत्यूही अपघातच! कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार न्यायालयाचा निकाल

Kamgar Din : कामावर असणाऱ्या ट्रकचालकाचा हृदयविकाराचा झटका येऊन झालेला मृत्यूसुद्धा अपघातच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कामगार न्यायालयाने दिला आहे.

सतीश निकुंभ

Kamgar Din : कामावर असणाऱ्या ट्रकचालकाचा हृदयविकाराचा झटका येऊन झालेला मृत्यूसुद्धा अपघातच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कामगार न्यायालयाने दिला आहे. तसेच या ट्रक चालकाच्या पत्नीला आणि अवलंबितास ६ लाख ७७ हजार ७६० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सिल्लोड तालुक्यातील सासुरवाडा येथील ट्रकचालक साहेबराव उत्तमराव सरोदे यांचा २०१३ मध्ये कामावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ( Labor Court judgment for employed employees marathi news)

त्यांनतर त्यांच्या पत्नी कमलबाई सरोदे यांनी ट्रकमालक आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. यांच्याविरुद्ध कामगार न्यायालयात धाव घेत नुकसान भरपाईची मागणी केली होती. साहेबराव सरोदे आणि त्यांचा क्लीनर रोहिदास गाघणे २ मे २०१३ रोजी कर्मयोगी पाटील साखर कारखाना बिजवडी, पुणे येथे साखर आणण्यासाठी गेले होते. दरम्यान सरोदे आणि त्यांच्या क्लिनरने ट्रकमध्येच मुक्काम केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता ट्रकचालक सरोदे हे कारखाना परिसरात नैसर्गिक विधीसाठी गेले. त्यावेळी त्यांचा अचानक मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करत मृतदेह उत्तर तपासणीसाठी पाठवला होता. त्यानंतर डॉक्टरांच्या अहवालानुसार सरोदे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्यामुळे कामावर असताना ही घटना घडली असून नुकसान भरपाईसाठी त्यांच्या पत्नीने न्यायालयात धाव घेतली.

सरोदे यांच्या पत्नीने १० लाखांची मदत मिळावी म्हणून नुकसान भरपाई कायद्याअंतर्गत कामगार न्यायालयात अर्ज सादर केला होता. पण यावेळी संबंधित इन्शुरन्स कंपनीकडून स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्न झाला. सरोदे यांचा मृत्यू हा नैसर्गिक असून तो अपघाती नसल्याचा दावा केला. त्यामुळे ते नुकसान भरपाईसाठी पात्र नसल्याचा दावा कंपनीने केला.(Latest Marathi News)

सरोदेंच्या वकिलांचा दावा

कंपनीच्या दाव्यामुळे सरोदे यांच्या बाजूने त्यांचे वकील संदीप बी. राजेभोसले यांनी बाजू मांडली. अपघातावेळी सरोदे ट्रक मालक सुरेश भीमसिंग राजपूत यांच्या अपघातग्रस्त ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करायचे. त्यांना ट्रकमालक १० हजार रुपये प्रतिमहिना पगार द्यायचे. सरोदे यांना हृदयविकाराचा आजार नव्हता.

ट्रकमालकाने सरोदे यांच्यासोबत दुसरा सहकारी ड्रायव्हर दिला नव्हता. सरोदे यांनाच सलग १५ तास ट्रकचालवावा लागत होता. कामाच्या तणावामुळेच नैसर्गिक विधीला गेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सरोदे यांना आलेला हृदयविकाराचा झटका हा नैसर्गिक मृत्यू नसून अपघातच असल्याचा युक्तिवाद राजपूत यांनी केला.

न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल

यावेळी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर कामगार न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मृत साहेबराव सरोदे यांची पत्नी आणि कुटुंबास प्रतिवादी ट्रकमालक, विमा कंपनी यांनी संयुक्तरित्या ६ लाख ७७ हजार ७६० रुपये मदत करण्याचे आदेश दिले.

सोबतच ही रक्कम अपघात झाल्याच्या तारखेपासून १२ टक्के व्याजासह देण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला. तसेच ट्रक मालकाला ३ लाख ३८ हजार ८८० रुपयांचा दंडही सुनावला. याबरोबरच सरोदे यांचा अंत्यविधी खर्च म्हणून ५० हजार आणि नुकसान भरपाईचा अर्ज खर्चाचे ५ हजार देण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT