death esakal
नाशिक

Nashik News : पाचव्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

Nashik News : औद्योगीक वसाहतीतील दत्तनगर भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने २२ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : औद्योगीक वसाहतीतील दत्तनगर भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने २२ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना न केल्याने ही घटना घडल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Laborer dies after falling from fifth floor)

वीरेंद्र पंडित असे संशयित ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत संकेत सुनील सांगळे (रा. मुरारीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत हिरामण सीताराम मोंढे (२२ रा. पोकरपाडा- धीवरगाव, ता. जि. नाशिक) या मजुराचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. ६) दुपारी ही घटना घडली होती.

कारगिल चौकात सुरू असलेल्या तुळजा हाईटस या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील टेरेसवर मृत हिरामण मोंढे, लक्ष्मण दिवे व दिनकर मोंढे हे तीन मजूर मालवाहू क्रेन फिट करीत असताना हा अपघात झाला होता.

हिरामण मोंढे क्रेनच्या आतमधून नट फिट करत असताना अचानक तोल गेल्याने क्रेनसह तो जमिनीवर कोसळला होता. जखमी अवस्थेत त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले.

दरम्यान ठेकेदार वीरेंद्र पंडित याने मजुराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न केल्याने हा अपघात झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Updates : मोदींच्या एआय व्हिडीओमुळे पुण्यात भाजपचं आंदोलन

SCROLL FOR NEXT