Broken glass windows of social welfare department girls hostel. esakal
नाशिक

Nashik : मुलींच्या वसतिगृहांत सुविधांची वानवा! सुरक्षारक्षक अपुरे, खिडक्यांच्‍या काचा फुटक्या; ‘सामाजिक न्याया’ची प्रतीक्षा

Latest Nashik News : वसतिगृहात पायाभूत सुविधा नसल्याने वसतिगृहांची दुरवस्था कायम असल्याचे ‘सकाळ’च्‍या पाहणीत आढळले.

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बदलापूर येथील घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याच अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाकडून चालविल्या जाणाऱ्या मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेत वाढ झाली आहे. मात्र सुरक्षारक्षकांच्या तोकड्या संख्येमुळे मुलींमध्ये असुरक्षितता आहे. दुसरीकडे वसतिगृहात पायाभूत सुविधा नसल्याने वसतिगृहांची दुरवस्था कायम असल्याचे ‘सकाळ’च्‍या पाहणीत आढळले. (Lack of facilities in girls hostels)

सामाजिक न्याय विभागाच्या नाशिक शहरात पुणे रस्त्यावर सामाजिक न्याय भवन परिसरात मुलींची स्वतंत्र तीन वसतिगृहे आहेत. चौथे वसतिगृह क. का. वाघ महाविद्यालयामागील दुर्गानगर भागात आहे. या सर्व वसतिगृहांत एकूण ७०० मुली वास्तव्य करून शिक्षण घेतात. सामाजिक न्याय भवन परिसरातील तीन वसतिगृहांच्या चार इमारती आहेत.

प्रत्येक वसतिगृहाच्या इमारतीस स्वतंत्र महिला सुरक्षारक्षकाची नेमणूक आहे. इमारतींच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असून, त्यांपैकी काही बंद होते. बदलापूरच्‍या घटनेनंतर हे कॅमेरे कार्यान्‍वित केले आहेत. यातील तिसऱ्या वसतिगृहातील पहिल्या इमारतीचे कॅमेरे बंद असल्याचे सांगण्यात आले, तर दुसऱ्या इमारतीला कॅमेरे बसविलेले नाहीत.

तसेच या इमारतीस स्वतंत्र सुरक्षारक्षकही नसल्याचे सांगण्यात आले. या इमारतीजवळील संरक्षण भिंतीची उंची कमी असल्याने या बाजूने बाहेरील व्यक्ती आत येण्याचा मोठा धोका आहे. याशिवाय टवाळखोरांकडून येथे मद्याच्या बाटल्या फेकल्या जातात. त्यामुळे येथे बाटल्यांचा खच दिसतो.

येथील इमारतींतील खिडक्यांच्‍या काचा मोठ्या प्रमाणावर फुटलेल्या आहेत. पावसाळ्यात यातून पाणी येते. याच परिस्थितीत मुलींना रूममध्ये राहावे लागते. काचा फुटल्याने येथून कोणीही यात येण्याचा धोका आहे. दुर्गानगरच्या वसतिगृहाची भव्य इमारत मुख्य रस्त्यापासून खूप आत असल्याने परिसर निर्मनुष्य असतो. सायंकाळनंतर परिसरात चिटपाखरूही फिरकत नाही.

यामुळे रात्री-अपरात्री वसतिगृहाकडे जाताना परिसरातील टवाळखोरांचा मोठा त्रास होतो. त्यांच्याकडून कायम अश्लील चाळे, छेडछाडीच्या तक्रारी विद्यार्थिनींनी केल्या. इमारतीमागे मोकळी जागा असून, येथे संरक्षण जाळी नाही. तक्रारीनंतर पोलिस पेट्रोलिंग होते. दामिनी पथकाकडे तक्रार गेल्यानंतर त्या येतात, असे विद्यार्थिनींनी सांगितले. (latest marathi news)

शहरातील मुलींचे वसतिगृहे : एकूण ४

विद्यार्थिनींची एकूण संख्या : ७००

सुरक्षारक्षक महिला संख्या : १२

सर्व इमारती मिळून सीसीटीव्ही कॅमेरे : ५०

वसतिगृहातील समस्या

-वसतिगृहातील इमारतींच्या काचा फुटलेल्या.

-पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर व्यवस्था अपुरी.

-पावसाळ्यात वीजप्रश्न गंभीर, पर्यायी व्यवस्था नाही.

-मेसबाबत असंख्य तक्रारी.

-पुरेसा औषधसाठा नसतो. रात्रीच्या वेळी आपत्कालीन प्रसंगी बाहेरील डॉक्टरांना पाचारण करावे लागते. त्यासाठी मुलींना वेगळा चार्ज आकारला जातो.

-मुलींना वसतिगृहात अभ्यासासाठी स्वतंत्र वाचनालय, खुर्च्या नाहीत.

-नियमित भत्ता वेळेत मिळत नाही.-सुरक्षारक्षक महिलांकडून अरेरावी.

वसतिगृहाची सुरक्षा कडक

सामाजिक न्याय विभागाकडून हे वसतिगृह चालविले जात असल्याने, विभागाने वसतिगृहाची सुरक्षाव्यवस्था कडक असल्याचा दावा केला आहे. वसतिगृहात पुरुष व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही, महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक केलेली आहे.

सीसीटीव्ही सुरू असून, तक्रारी आल्यास त्याची नियमित तपासणी केली जाते. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक समित्यांची स्थापना केलेली असून, त्यांच्याकडे तक्रारी नाहीत. वसतिगृहातून मुलींना सायंकाळी सहानंतर बाहेर सोडले जात नाही, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.ले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT