A railway underpass filled with water during a rain esakal
नाशिक

Nashik News : एका पावसात अंडरपास बनला तलाव; चुकीच्या बांधकामामुळे लाखांचे नुकसान

Nashik : भगूर इगतपुरी रस्त्यावर वंजारवाडी रेल्वे गेट येथे दोन महिन्यापूर्वी तयार केलेला अंडरपास हा एका पावसातच संपूर्ण पाण्याने भरून गेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : भगूर इगतपुरी रस्त्यावर वंजारवाडी रेल्वे गेट येथे दोन महिन्यापूर्वी तयार केलेला अंडरपास हा एका पावसातच संपूर्ण पाण्याने भरून गेला आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच अन्‌ नागरिकांना पुन्हा रेल्वे रुळावरूनच जीव मुठीत घालून क्रॉसिंग करावा लागत आहे. नागरिकांचा वेळ वाचावा, त्यांना ताटकळत रेल्वे क्रॉसिंगवर वाट बघावा लागू नये या उद्देशाने रेल्वे विभागाने सदर अंडरपास केला आहे. ( lake became underpass in one rain loss of lakhs due to wrong construction )

मात्र एकाच पावसामध्ये हा अंडरपास पूर्ण पाण्याने भरून गेल्यामुळे रेल्वेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या अंडरपासच्या अगोदर रेल्वे क्रॉसिंगवर ताटकळत नागरिकांना उभे राहावे लागत असे. सदर रेल्वे लाइनही मध्य रेल्वेची असून येथून कायम रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे किमान दहा पंधरा मिनिटे गेट उघडले जात नाही किंवा एका मागोमाग एक ट्रेन येत असतात. त्यामुळे अधिक विलंबही लागतो. (latest marathi news)

ज्या हेतूने हा अंडरपास तयार करण्यात आला होता. तो हेतू साध्य झालेला दिसत नाही. वंजारवाडी, लोहशिंगवे, भगूर, लहवित हा परिसर नाशिक शहराच्या जवळ आहे. त्यामुळे रोज नोकरी, व्यवसाय व शाळा, कॉलेज यानिमित्ताने प्रवास करणाऱ्या नागरिकांची व विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सर्वांना वेळेवर आपल्या इच्छितस्थळी पोचायचे असते. मात्र सकाळी रेल्वे गाड्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे प्रवाशांना क्रॉसिंगवर बराच वेळ वाट बघावा लागते. .

''रेल्वे हे देशातील महत्त्वाचे एक खाते आहे. इतकी मोठी यंत्रणा असलेल्या विभागाकडून असा निष्काळजीपणा अपेक्षित नाही. त्यांच्या बांधकाम विभागाकडून निश्चित चूक झालेली आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर या समस्येवर रेल्वे विभागाने उपाय काढावा.''- राजेश जाधव, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT