नाशिक

राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी मोहन चकोर यांची निवड समीर जाधव यांच्याकडे कार्यवाहपद,हिंदी भाषा प्रचारासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार

CD
27406 नाशिक : जिल्हा राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या अध्यक्षपदी मोहन चकोर, तर कार्यवाहपदी समीर जाधव यांची निवड झाल्यावर सत्कार करताना पदाधिकारी. राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन चकोर सकाळ वृत्तसेवा येवला,ता. ४ : महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती, पुणे अंतर्गत नाशिक जिल्हा राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या अध्यक्षपदी मोहन चकोर, तर कार्यवाहपदी समीर जाधव यांची निवड करण्यात आली. नाशिक येथे जिल्हा संघटनमंत्री बन्सीलाल गाडीलोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी जिल्ह्यात राष्ट्रभाषा हिंदीचा प्रचार व प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात हिंदी प्रचार कार्यशाळांचे आयोजन करणे,विद्यार्थ्यांना हिंदीच्या विविध परीक्षांना प्रविष्ट होण्यासाठी प्रोत्साहित करणे, तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये हिंदी भाषेविषयी आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी मोहन चकोर, कार्याध्यक्षपदी अरविंद पाटील, कार्यवाहपदी समीर जाधव, उपाध्यक्षपदी विनोद हिरे व राजश्री ससाने, तर कोषाध्यक्षपदी विजया पाटील यांची निवड करण्यात आली.जिल्हा प्रतिनिधी,सदस्य म्हणून नाशिक येथून मुन्ना शुक्ल, नाशिक ग्रामीणमधून संजय राजगुरू, सिन्नरमधून वैशाली सानप, नांदगावमधून एस. एम. बोरसे, त्र्यंबकेश्वरमधून प्रभाकर खिरारी, निफाडमधून रशीद पठाण, मालेगावमधून सागर हजारे, कळवणमधून नलिनी देशमुख, सटाणामधून किशोर देवरे, इगतपुरीमधून धोंडीराम गुंजाळ, सुरगाणामधून दिनेश पवार, चांदवडमधून समाधान कोल्हे, येवल्यातून यशवंत पाटील, पेठमधून दीपक अहिरे आणि दिंडोरीमधून अनिल परदेशी यांची निवड करण्यात आली. बैठकीला कला संघटनेचे अध्यक्ष सचिन पगार, सुनीता काकड, प्रशांत पगार, लता शिंदे, अतुल आढाव, अनिल पाटील, सुरेश भांबळ आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकारी व तालुका प्रतिनिधींचा सत्कार जिल्हा संघटनमंत्री बन्सीलाल गाडीलोहार व जिल्हाध्यक्ष चकोर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चकोर यांनी नाशिक जिल्हा राष्ट्रभाषा प्रचार समितीची भूमिका व कार्यप्रणाली स्पष्ट केली. बन्सीलाल गाडीलोहार यांनी राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यवाह समीर जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

MSRTC strike Diwali: ऐन दिवाळीत 'एसटी'चा संप! कर्मचाऱ्यांनी दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

कोणाकडे तरी आकर्षित होऊन... वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी का केलं दुसरं लग्न? आता सांगितलं कारण, म्हणाले-

SCROLL FOR NEXT