The statue of Mahatma Phule and Savitribai Phule installed at Savitribai Phule Chowk here. esakal
नाशिक

Nashik : फुले दांपत्याचा ब्राँझ धातूचा पुतळा देशात सर्वात मोठा; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण

Nashik : मुंबई नाका येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. २८) दुपारी तीन वाजता होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. २८) दुपारी तीन वाजता होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादा भुसे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. (largest bronze statue of Phule couple in country will be inaugurated tomorrow by Chief Minister)

फुले दांपत्याचे कार्य समाजापर्यंत पोचविताना ते रुजविण्यासाठी मुंबई नाका येथे सावित्रीबाई फुले चौकात स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूचे शिल्प बसविण्यात आले आहे. स्मारकासाठी मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात आला. (latest marathi news)

सोहळ्यास खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजित तांबे, आमदार किशोर दराडे, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, सरोज आहिरे, माजी आमदार पंकज भुजबळ, वसंत गिते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे प्रवीण तिदमे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गजानन शेलार, भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर, काँग्रेस शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड, डॉ. डी. एल. कराड, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर आदी उपस्थित राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT