Gram Panchayat employees who participated in the strike  esakal
नाशिक

Nashik News : लासलगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच! अधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ

Nashik News : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांनी बुधवार (ता. १३)पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे.

मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान सुरू झाला आहे. आंदोलनाचा त्यांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. आंदोलनात बाबा गिते, विलास खैरनार, पवन सानप, मंगेश आहिरे, रूपेश पवार, जनार्दन गोसावी, सुरेश शेजवळ, माणिक शिंदे, किरण गुरव, बापू सोनवणे व कर्मचारी सहभागी झाले आहेत. (Nashik Lasalgaon Gram Panchayat employees strike marathi news)

ग्रामपंचायत कर्मचारी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन घ्यायला गेले असता, त्यांच्याकडूनही टोलवाटोलवी झाल्याचा अनुभव कर्मचाऱ्यांना आला. निफाडचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी या सर्वांना भेटूनही कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याचा अनुभव आला.

त्यामुळे नाइलाजाने कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. आंदोलनामुळे लासलगाव पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता यांच्यासह सर्व विभाग प्रभावित झाले असून, त्याचा फटका लासलगावकरांना बसत आहे. (latest marathi news)

आंदोलनाला ग्रामपंचायत युनियन कर्मचारी, दिव्यांग बांधव, लासलगाव शहर विकास समिती, माजी सरपंच जयदत्त होळकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष पलोड, प्रभारी सरपंच रामनाथ शेजवळ, माजी उपसरपंच अफजलभाई शेख, चंद्रशेखर होळकर, योगिता पाटील, दत्ता पाटील, अमिता ब्रह्मेचा व सचिन होळकर यांनी पाठिंबा दिला आहे.

"लासलगाव ग्रामपंचायत सरपंच निवडीचा प्रश्न न्यायप्रविष्ट असला, तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कामबंद आंदोलनाची वेळ यायला नको. कामबंद आंदोलनामुळे पाणी, स्वच्छता, आणि दिवाबत्ती प्रभावित झाले आहे. त्याचा त्रास लासलगावकरांना होत आहे. कर्मचाऱ्यांचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा."-ॲड. उत्तमराव नागरे, लासलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT