Inauguration of CCTV cameras installed in Kazigadhi area.
Inauguration of CCTV cameras installed in Kazigadhi area. esakal
नाशिक

Nashik News : ‘देर आये दुरुस्त आये’ काझीगढी परिसरात CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : काझीगढी, कुंभारवाडा भागात वाहन जाळपोळीची घटना घडली होती. वाहने जळून राख होऊन लाखोंचे नुकसान झाले होते. घटना घडल्यानंतर सर्वांना जाग आली. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. यापूर्वी स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार कॅमेरे बसविले असते तर घटना टळली असती. ‘देर आये दुरुस्त आये’, अशा प्रतिक्रिया स्थानिकांकडून देण्यात आल्या. ()

मंगळवारी (ता. २०) मध्यरात्री अडीचच्या सुमारास काझीगढी येथे वाहनांची जाळपोळ करण्याची घटना घडली होती. यापूर्वीही तीन ते चार वेळेस वाहन जाळपोळ करणे, दोन ते तीन वेळा वाहनांची तोडफोड करणे अशा घटना घडल्या आहेत. दगडफेक करत वाहनांचे सीट फाडणे अशा घटना नित्याच्या घडत असतात.

रहिवासी नेहमी भीतीच्या सावटात असतात. अशा घटनांना आळा बसावा, यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांकडून वारंवार केली जात होती. त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने घटनांमध्ये वाढ झाली होती. मंगळवारी घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा विषय ऐरणीवर आला. (latest marathi news)

रहिवाशांनी पुन्हा एकत्र येत परिसरात पोलिस ग्रस्त वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशी मागणी केली. जाळपोळीच्या घटनेतील वाहनांच्या नुकसानीनंतर त्यांच्या मागणीस यश आले. आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून परिसरात विविध ठिकाणी चार कॅमेरे बसवून लोकार्पण करण्यात आले.

परिसरातील रहिवासीयांनी विशेषतः महिलांनी आभार मानले. परंतु हेच कॅमेरे यापूर्वी मागणी केली होती त्या वेळेस बसविले असते तर कदाचित वाहन जाळपोळीची घटना आणि त्यातील नुकसान टाळता आले असते, अशा प्रतिक्रिया रहिवाशांनी दिल्या. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील आणि परिसरातील रहिवासी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT