Leader Sanjay Raut invited Adv Nitin Thackeray to join Shiv Sena party esakal
नाशिक

Nashik News : ॲड. नितीन ठाकरे यांना शिवसेनेची साद; शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर भाषणातून पक्षप्रवेशाचे दिले निमंत्रण

Nashik News : मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची लोकसभा निवडणूक लढण्याची संधी हुकल्याने त्यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील नामांकित मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची लोकसभा निवडणूक लढण्याची संधी हुकल्याने त्यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये त्यांना मशाल हाती घेऊन आपला राजकीय मार्ग सुकर करण्याची साद घातली आहे. (Nashik News)

विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांसमोरच त्यांनी हा प्रस्ताव ठेवल्याने इच्छुकांच्या गोटात अस्वस्थता पसरलेली दिसते. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला ३१ जागांवर अभूतपूर्व यश मिळाल्याने नेत्यांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रविवारी (ता. २३) नाशिकमध्ये मेळावा घेण्यात आला.

त्या वेळी खासदार राऊत यांनी जाहीर भाषणातून ॲड. ठाकरेंना पक्षप्रवेशाचे निमंत्रणच दिले. ते म्हणाले, की गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘मविप्र’ समाज शिक्षण संस्थेने शुभशकुन देत नाशिक व धुळ्यातील दोन सदस्यांना दिल्लीत पाठविले. आता शिक्षकांचे प्रश्‍न मांडण्यासाठी ॲड. गुळवे हे तिसरे प्रतिनिधी सज्ज झाले आहेत. लोकसभेपासून विजयाचा सुरू झालेला सिलसिला येत्या विधानसभेतही कायम राहील. (latest marathi news)

त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ॲड. ठाकरे तुम्ही शिवसेना प्रवेशाचा निर्णय घ्या. शिवसेनेची भगवी शाल परिधान केल्यावर तुमचा राजकीय मार्ग अधिक सुकर होईल, असेही ते म्हणाले. माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर.

शहराध्यक्ष विलास शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार राऊतांनी हा प्रस्ताव ठेवल्याने इच्छुकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. ॲड. ठाकरे यांनी शिवसेनेचा प्रस्ताव मान्य केल्यास भविष्यात नाशिक शहरात विधानसभेच्या इच्छुकांमध्ये चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

ॲड. ठाकरेंना साद घालण्याचे कारण

लोकसभा निवडणुकीत ॲड. नितीन ठाकरे इच्छुक होते. त्यांनी महायुतीसह महाविकास आघाडीच्या पक्षांकडेही उमेदवारीची मागणी केली. त्यांचा प्रस्ताव येईपर्यंत फार उशीर झालेला होता, त्यामुळे बंडखोरी करून उमेदवारी करण्यापेक्षा त्यांनी दिल्लीचा मार्ग सोडून मुंबईच्या दिशेने आपली गाडी वळवली आहे. आतापासून आपली दावेदारी टिकवून ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न दिसतात. यामुळेच त्यांना महाविकास आघाडीकडून विधानसभेची उमेदवारी देण्याचा विचार पुढे आला आणि खासदार राऊत यांनी हा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT