Materials used to build digital LED displays. In the second photo, a closed display against the Zilla Parishad wall. esakal
नाशिक

Nashik News : शहरातील एलईडी डिस्प्ले धूळखात; लाखो रुपयाचा खर्च पाण्यात

Nashik News : महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकणारे एलईडी डिस्प्ले आणि त्याचे साहित्य बिडी भालेकर मैदानावर कचराकुंडीत धुळखात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकणारे एलईडी डिस्प्ले आणि त्याचे साहित्य बिडी भालेकर मैदानावर कचराकुंडीत धुळखात आहे. तर शहरातील काही भागात बसविण्यात आलेले डिस्प्ले बंद अवस्थेत आहे. यामुळे मनपाच्या उत्पन्न तर भर पडली नाही, उलट त्यासाठी लाखोंचा केलेला खर्च वाया गेल्याचे चित्र आहे. (LED display and its materials are in dustbin)

स्मार्ट सिटी करण्याच्या अनुषंगाने महापालिकेकडून विविध प्रकल्प राबवले जात आहे. त्यातील एक प्रकल्पातंर्गत शहरातील मुख्य चौकांसह ठिकठिकाणी डिजिटल एलईडी डिस्प्ले बसविण्यात आले होते. यावर शहरातील पार्किंग संदर्भातील माहिती आणि व्यावसायिकांच्या जाहिराती प्रसारित करून महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न होता.

जिल्हा परिषद मुख्यालय जवळील रस्ता, त्र्यंबक सिग्नल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, दिंडोरी रोड अशा विविध भागात रस्त्याच्या कडेला एलईडी डिस्प्ले बसवण्यात आले होते. त्यावर त्या मार्गावरील पार्किंग संदर्भातील माहिती देण्यात आली होती.

तसेच शहर परिसरातील व्यावसायिकांच्या जाहिराती प्रसारित करण्यात येत होत्या. काही महिने योग्यरीत्या डिस्प्ले सुरू होते. त्यामुळे नागरिकांना त्यांचे वाहन पार्किंग बाबत माहिती मिळत होती. योग्य ठिकाणी वाहने पार्क केल्याने वाहनांवरील पोलिस कारवाई टाळण्यास मदत होत होती. (latest marathi news)

दीड वर्षापासून साहित्य पडून

स्मार्टसिटी अंतर्गत रस्त्याचे कामे करण्यासह विविध कारणांनी डिस्प्ले बंद करण्यात आले. काही डिस्प्ले काढून ठेवण्यात आले. अशाच प्रकारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकातील डिस्प्ले काढून घेण्यात आले. डिस्प्ले बसवण्यासाठी वापरण्यात आलेले लोखंडी मोठे खांब कमानी बिडी भालेकर मैदानातील कचराकुंडीत ठेवण्यात आले आहे.

सुमारे दीड वर्षापासून अशाच प्रकारे त्याठिकाणी साहित्य धुळखात पडून आहे. तर जिल्हा परिषद भिंती लागत आणि त्र्यंबक सिग्नल चौकातील चर्च समोरील पेट्रोल पंपास लागून असलेल्या रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले डिस्प्ले बंद अवस्थेत शोभेच्या वस्तू ठरत आहे.

वापराविना त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ साचली आहे. संपूर्ण शहरात अशा प्रकारचे डिस्प्ले लावून महापालिकेच्या तिजोरीत भर पाडण्याचा प्रयत्न होता. प्रत्यक्षात मात्र डिस्प्लेंवर खर्च करण्यात आलेला लाखोंचा निधी वाया गेल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT