नाशिक

शासकीय विभागीय ग्रंथालयात सभासद नोंदणी अभियान

CD
शासकीय विभागीय ग्रंथालयात सभासद नोंदणी अभियान ९७ हजार ग्रंथांचे ज्ञानभांडार; नव्या ग्रंथांचे प्रदर्शनही खुले सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नाशिकच्या शासकीय विभागीय ग्रंथालयात वाचकांसाठी सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. वाचक, अभ्यासक, संशोधक, साहित्यिक, विद्यार्थी, महिला, बालक तसेच दिव्यांग वाचकांना याचा लाभ घेता येणार आहे. नाशिक विभागातील महत्त्वाचे संदर्भ ग्रंथालय म्हणून या ग्रंथालयाची ओळख असून, सध्या येथे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ९७ हजारांहून अधिक ग्रंथ उपलब्ध आहेत. याशिवाय २० दैनिके, २१ नियतकालिके आणि दरवर्षी सुमारे ६० दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून दिले जातात. चरित्रे, संदर्भग्रंथ, कथा-कादंबऱ्या, व्यक्तिमत्त्व विकास, महिला व बालवाङ्मय तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक ग्रंथांचा समावेश या संग्रहात आहे. ग्रंथालयाच्या वाचनकक्षात कार्यालयीन वेळेत ग्रंथ, वृत्तपत्रे आणि नियतकालिके वाचण्याची सुविधा मोफत आहे. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ग्रंथालयात नव्याने दाखल झालेल्या ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन ९ ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत वाचक, ग्रंथप्रेमी, साहित्यिक, संशोधक आणि अभ्यागतांसाठी खुले राहणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले यांनी दिली आहे. --- १९७४ मध्ये स्थापना महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमातील तरतुदींनुसार २९ जुलै १९७४ रोजी शासकीय विभागीय ग्रंथालयाची स्थापना झाली. १९७८ पासून हे ग्रंथालय नाशिक रोड येथील जवाहर मार्केटमधील महापालिकेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कार्यरत आहे. सप्टेंबर २०२६ अखेर ग्रंथालयाचे ३५७ वैयक्तिक आणि ४३ संस्था सभासद आहेत. सभासदांना संदर्भग्रंथ वगळता अन्य ग्रंथ देव-घेव पद्धतीने वाचनासाठी उपलब्ध करून दिले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टीम इंडियाचे 'Fantastic Four'! आयसीसीची मोठी घोषणा, जगात भारताच्या ८ खेळाडूंचा डंका

Sant Balumama Temple Land Scam : आदमापुरातील संत बाळूमामा ट्रस्ट जमीन गैरव्यवहारात अतिग्रेच्या माजी सरपंचाला अटक; सात दिवसांची पोलिस कोठडी

अनेकांनी पैसे बुडवले, पत्नीमुळे तरला! 'हे' काम करते 'दृश्यम ३'मधल्या गायतोंडेची बायको; दिसायलाही आहे इतकी सुंदर

Latest Marathi News Live Update : विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरोधी पक्षाच्या खासदारांसोबतच्या स्नेहभोजनास उपस्थित

Bharadi Death News: भराडीत दारूच्या दुकानासमोर तरुणाचा मृतदेह; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

SCROLL FOR NEXT