Tourists taking selfies on the banks of the Godavari river even when the water is flowing. esakal
नाशिक

Nashik News : रामसेतूवरील पुराच्या पाण्यात‘सेल्फी’ साठी जीव धोक्यात

Nashik : गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पावसाने जरी उघडीप दिली असली तरीही गोदाघाट अद्यापही पाण्याखाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पावसाने जरी उघडीप दिली असली तरीही गोदाघाट अद्यापही पाण्याखाली आहे. तर, दुतोंडी मारुतीनजीकच्या रामसेतूवर पाणी आहे. या पुलावर पाण्याच्या प्रवाहास वेग असतानाही त्याठिकाणी तरुणाई जीव धोक्यात घालून मोबाईलमध्ये ‘सेल्फी’ घेताना दिसून येत आहे. शुक्रवारी (ता.२) मध्यरात्रीपासून शहर आणि गंगापूर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. (Life in danger for Selfie in flood waters of Ram Setu )

त्यामुळे रविवारी (ता.४) गोदावरी नदीला यंदाच्या मोसमातील पहिला पूर आला. रविवारीच दुपारी गोदाकाटावर धार्मिक विधी केल्यानंतर पुराच्या पाण्यात पाय धुण्यासाठी गेलेला तरुण इंजिनिअर तोल जाऊन वाहून गेल्याची घटना घडली होती. सोमवारी (ता.५) पावसाने उघडीप दिल्याने पूर ओसरला असला तरीही गोदाघाटावरील रामसेतू अजून पाण्याखाली आहे.

असे असतानाही गोदावरीचा पुर पाहण्यासाठी आलेली नागरिक व तरुणाई ही रामसेतूवरील पुराच्या पाण्यात जाऊन मोबाईलमध्ये सेल्फी घेण्याचा आनंद घेत आहे. परंतु पुराच्या पाण्याचा प्रवाह अजूनही जोरदार असून, या पुलाला उंच कठडे नाहीत. त्यामुळे पुराच्या पाण्यात पाय सरकून निसटल्यास थेट गोदापात्रात वाहून जाण्याची व जीव गमावण्याचीच शक्यता अधिक आहे. मात्र तरीही पुराच्या पाण्यातील सेल्फी काढण्यासाठी काहीजण नको ते धाडस करताना दिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Army Attack : बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा दहशतवादी हल्ला; सलग दुसऱ्या दिवशी पाच सैनिक ठार

Gold Rate Today : लक्ष्मीपूजनादिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Lakshmi Pujan : लक्ष्मीपूजन दिवशी चुकूनही करू नका 'या' 3 गोष्टी, नाहीतर माता लक्ष्मी अन् कुबेर देव दोघेही होतील नाराज

Pakistan Cricket : पाकिस्तानची संगीत खुर्ची! मोहम्मद रिझवानचा 'करेक्ट कार्यक्रम' करून २५ वर्षीय खेळाडूला केलं कॅप्टन

Kolhapur GST Rate : कोल्हापुरात ‘जीएसटी’ कमी न करताच वस्तूंची विक्री, ग्राहकांची लूट; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

SCROLL FOR NEXT